इंदापूर - बारामतीतील विमानतळावरून सकाळी उड्डाण केलेले विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीनजीक कोसळले आहे. विमान ( plane crashed ) कशामुळे पडले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत महिला पायलट प्रशिक्षण दिले जात होते. आज सकाळी बारामतीतून विमानतळावरून ( Baramati Airport ) उड्डाण केलेले हे विमान फिरत असतानाच अचानक कडबनवाडी येथील शेतकरी बारहाते यांच्या शेतात कोसळले आहे.
अधिकारी पथक हजर - ही घटना समजताच शेजारील पोंदकुले वस्तीवरील तरुण या ठिकाणी पोहचले. त्यांनी महिला पायलटला सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. या महिला पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून, बाकी विमानाची मात्र दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी बारामतीतून अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पथक तिथे पोहोचले.
हेही वाचा - अंधश्रद्धेचा कळस! मासिक पाळी असल्याने विद्यार्थिनीला झाड लावण्यास मजाव