पुणे - वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ( Pune Builder Murder In Wandwadi ) वानवडी येथील मोहम्मद वाडी जवळ अनैतिक संबंधांच्या वादातून एका 50 वर्षीय व्यक्तीची ( 50 year old man Murder In Pune ) हत्या करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी आज पोलिसांनी एका 32 वर्षीय महिलेसह महिलेसह दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताजुद्दिन हबीब पठाण, असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
उचारादरम्यान झाला होता मृत्यू -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजुद्दीन यांचा पुण्यात बांधकामाचा व्यवसाय होता. याच व्यवसायात त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका महिलेसोबत त्यांचे अनैतिक संबंध होते. या कारणावरून ताजुद्दीन यांचा मुलगा आणि पत्नी मागील आठ महिन्यांपासून त्यांच्यासोबत राहत नव्हते. दरम्यान, याच अनैतिक संबंधांना विरोध करत आरोपी महिला आणि तिच्या नातेवाईकांनी ताजुद्दीन यांना बेदम मारहाण केली होती. यात गंभीर जखमी झालेल्या ताजुद्दीन त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - मुंबईकरांना राज्य सरकारकडून नववर्षाचं मोठं गिफ्ट.. 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ