पुणे :- पुणे तिथं काय उणे ही म्हण नेहेमीच पुणेकरांच्या विविध कृतीतून येतच असते. शहरात कधी कोण काय करेल याची नेम नाही. अशाच या पुणे शहरात एका अनोख्या रक्तदान शिबिराची (Blood donation Camp IN Pune) चर्चा सुरू आहे. या रक्तदान शिबिरात चक्क मांसाहारी रक्तदात्याला दोन किलो चिकन तर शाकाहारी रक्तदात्याला अर्धा किलो पनीर (2kg Chicken and 0.5kg Paneer) देण्यात येत आहे.
रक्तदात्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा (Shortage of Blood) जाणवत आहे. राज्य सरकारच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. पुण्यातही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात माजी नगरसेवक शंकर केमसे यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
500 किलो चिकन आणि 50 किलो पनीरचे वाटप
कोथरूड येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात रक्तदात्याला दोन किलो चिकन आणि अर्धा किलो पनीर देण्यात आले. दुपारपर्यंत रक्तदान शिबिरात 500 किलो चिकन आणि 50 किलो पनीरचे वाटप रक्तदात्यांना करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक शंकर केमसे यांनी दिली.
350 हून रक्त पिशव्यांचे संकलन -
तसेच या रक्तदान शिबिरामध्ये साडेतीनशेहून अधिक रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. रक्तदान केल्यानंतर मांसाहारी रक्तदात्यांना दोन किलो चिकन आणि शाकाहारी रक्तदात्यांना अर्धा किलो पनीर देण्यात येत असल्याने या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी गर्दी केली होती.
हेही वाचा - PM modi's account hacked: पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक ; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा