ETV Bharat / city

IIT ला सत्तरी तालुक्यात जागा दिल्याबद्दल विश्वजीत राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार - सत्तुरी तालुका

आयआयटीसारख्या प्रतिष्ठित ज्ञान संस्थेमुळे गोव्याच्या नावलौकिकात भर पडणार आहेच, परंतु गोवाही देशाच्या शैक्षणिक नकाशात एक उत्तम संस्था म्हणून स्थान मिळवेल. असे मत विश्वजीत राणेंनी व्यक्त केले.

vishwajeet rane thanks to pramod sawant for iit
IIT ला सत्तरी तालुक्यात जागा दिल्याबद्दल विश्वजीत राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
author img

By

Published : May 7, 2020, 12:40 PM IST

पणजी- गोव्यात सुरू होणारी आयआयटी शैक्षणिक संस्था उभारणी करण्यासाठी सत्तरी तालुक्यातील गुळेली गावची निवड करून मंजुरी दिल्याबद्दल आरोग्य मंत्री आमदार विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले आहेत.

आयआयटीसारख्या या प्रतिष्ठित ज्ञान संस्थेमुळे गोव्याच्या नावलौकिकात भर पडणार आहेच, परंतु गोवाही देशाच्या शैक्षणिक नकाशात एक उत्तम संस्था म्हणून स्थान मिळवेल. असे मत विश्वजीत राणेंनी व्यक्त केले. शिक्षणाचा दर्जा वाढण्या बरोबरच संशोधन आणि उद्योजकता यांनाही संधी मिळणार आहे. आयआयटी गोव्यात आल्यामुळे संबंधित विविध संस्थामध्ये समन्वय सुरू होईल. तसेच सत्तरी आणि उसगाव परिसराच्या आर्थिक विकासाला मदत होईल, असेही राणे म्हणाले.

जागा हस्तांतरित करण्यासाठी गुळेली येथे गोवा सरकारतर्फे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्य मंत्री राणे, आयआयटीचे संचालक बी. के. मिश्रा, गोव्याच्या शिक्षण सचिव नीला मोहनन, तंत्र शिक्षण संचालक विवेक कामत, गुळेली सरपंच अपुर्वा च्यारी आणि उपसरपंच नितेश गावडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, आयआयटी सुरु झाल्यानंतर या ठिकाणी सुमारे पाच हजारांहून अधिक लोकांचा वावर असेल, ज्यामुळे परिसराच्या आर्थिक विकासाला बळ मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.