ETV Bharat / city

कॅसिनो हटावची मोहीम राज्यभर राबविणार - गोसुमं - goa news

मांडवी नदीतील कॅसिनो 5 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात न्यावे, सरकारने कॅसिनो व्यवहाराची श्वेतपत्रिका काढावी, या मागणीसह सरकारचा निषेध करण्यासाठी आज गोवा सुरक्षामंचतर्फे राजधानी पणजीत निषेध मोर्चा काढला.

पणजीत निषेध मोर्चा
author img

By

Published : Jul 15, 2019, 11:31 AM IST

पणजी - मांडवी नदीतील कॅसिनो 5 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात न्यावे, सरकारने कॅसिनो व्यवहाराची श्वेतपत्रिका काढावी, या मागणीसह सरकारचा निषेध करण्यासाठी गुरुवारी गोवा सुरक्षामंच तर्फे राजधानी पणजीत निषेध मोर्चा काढला.

सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखालील या निषेध मोर्चाला गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष पक्षाचे पदाधिकारी, महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पणजीतील इमेक्युलेट चर्च येथून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातून हा मोर्चा आझाद मैदानावर पोहचला. तेथे त्याचे सभेत रूपांतर झाले. ज्यामध्ये पक्षाच्या नेत्यांनी उपस्थितांना कॅसिनो का हटविणे आवश्यक आहे, याविषयी मार्गदर्शन करत गोसुमंची याविषयीची भूमिका स्पष्ट केली.

मोर्चाविषयी बोलताना गोसुमं नेते सुभाष वेलिंगकर म्हणाले, गोव्यातील भाजप सरकार गोव्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करत आहेत. भाजप कॅसिनोंच्या कह्यात गेला आहे. त्यामुळे लोकांची फसवणूक करून राजकारण करत आहेत. अपप्रवृत्ती विरोधातील हा प्रातिनिधीक मोर्चा होता. ज्यामध्ये राज्याच्या विविध भागातील नागरिक सहभागी झाले होते.

पणजीत निषेध मोर्चा

पुढे बोलताना वेलिंगकर म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत मांडवीतील कॅसिनो हलवून 5 किलोमीटरवर समुद्रात घालवणे हाच आमचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे समविचारी लोक आणि बिगर सरकारी संस्था यामध्ये सहभागी झाल्यास गोसुमं आपला अभिनिवेश ठेवणार नाही. यासाठी प्रसंगी फलकावरील पक्षाचे नाव हटविण्याची तयारी आहे. कारण, ही लढाई राजकीय पक्षाची न उरता लोकांची झाली पाहिजे. या कॅसिनोंमुळे गोवा सरकारला केवळ 2 टक्के उत्पन्न मिळते. यांच्या परवान्यांची मुदत सहा महिन्यांची असते. मग सरकार त्यांचे नुतनीकरण का करत असते. या मोर्चात महिला आणि युवकांचा सहभागी मोठा होता. मोर्चात राज्य सरकार, मुख्यमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Intro:पणजी : मांडवी नदितील कँसिनो 5 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात न्यावे, सरकारने कँसिनोंची व्यवहाराची श्वेतपत्रिका काढावी या माखणी़सह सरकारचा निषेध करण्यासाठी आज गोवा सुरक्षामंच तर्फे राजधानी पणजीत निषेध मोर्चा काढला.

Body:सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखालील या निषेध मोर्चाला गोवा सुरक्षा मंचचे अध्थक्ष पक्षाचे पदाधिकारी, महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पणजीतील इमेक्यूलेट चर्च येथू मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातून हा मोर्चा आझाद मैदानावर पोहचला. तेथे त्याचे सभेत रूपांतर झाले. ज्यामध्ये पक्षाच्या नेत्यांनी उपस्थितांना कँसिनों का हटविणे आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन करत गोसुमंची याविषयीची भूमिका स्पष्ट केली.
मोर्चा विषयी बोलताना गोसुमं नेते सुभाष वेलिंगकर म्हणाले, गोव्यातील भाजप सरकार गोव्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करत आहेत. भाजप कँसिनोंच्या कह्यात गेला आहे. त्यामुळे लोकांची फसवणुक करून राजकारण करत आहेत. अपप्रवृत्ती विरोधातील हा प्रातिनिधीक मोर्चा होता. ज्यामध्ये राज्याच्या विविध भागातील नागरिक सहभागी झाले होते.
पुढे बोलताना वेलिंगकर म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत मांडवीतील कँसिनो हलवून 5 किलोमीटरवर समुद्रात घालवणे हाच आमचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे समविचारी लोक आणि बिगर सरकारी संस्था यामध्ये सहभागी झाल्यास गोसुमं आपला अभिनिवेश ठेवणार नाही. यासाठी प्रसंगी फलकवरील पक्षाचे नाव हटविण्याची तयांरी आहे. कारण ही लढाई राजकीय पक्षाची न उरता लोकांची झाली पाहिजे. या कँसिनोंमुळे गोवा सरकारला केवळ 2 टक्के उत्पन्न मिळते. यांच्या परवान्यांची मुदत सहा महिन्यांची असते. मग सरकार त्यांचे नुतनीकरण का करत असते.
या मोर्चात महिला आणि युवकांचा सहभागी मोठा होता. मोर्चात राज्य सरकाळ, मुख्यमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.