पणजी - कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देश लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे सर्वप्रकारचे व्यवहार ठप्प आहेत. या परिस्थितीचा फायदा उचलत लोकांची आर्थिक फसवणूक करणारा 'व्हिशिंग फ्रॉड' प्रकार समोर आला आहे. त्यामुळे लोकांनी सावध रहावे, असे आवाहन गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने केले आहे.
व्हिशिंग फ्रॉड म्हणजे अशी फसवणूक ज्यात प्रतिष्ठित कंपन्या किंवा विशेषतः कोणत्याही बँकस किंवा वित्तीय संस्था असे सांगून किंवा एखाद्या व्यक्तीला डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्ड आदिबाबतची माहिती उघड करण्यासाठी दूरध्वनी किंवा व्हॉइस मेसेजेस केला जातो. इएमआय पुढे ढकलण्याच्या बहाण्याने डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती, पीन आणि ओटीपी प्राप्त केला जातो.
अशा फसवणुकीतून स्वतःला वाचवण्यासाठी घेतलेले पाऊल म्हणजे गोवा पोलिसांनी कोणालाही अशी माहिती देऊ नये, असा सल्ला दिला आहे.