पणजी (गोवा) - तृणमूलची धुरा समर्थपणे गोव्यात सांभाळणारे लुझिनो फलेरो (Luzino Falero) आता कोलकात्यातील कोट्यातून राज्यसभा खासदार (Rajya Sabha MP) होणार आहे. तसे पत्र तृणमुल काँग्रेसने फलेरो यांना दिले आहे. दरम्यान फलेरो यांची राज्यसभा खासदारकी निश्चित झाल्यावर राज्यातील तृणमूलच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
गोव्याचा आवाज राज्यसभेत गाजणार -
राज्याला तृणमुल काँग्रेसकडून देशात नेतृत्व मिळवून देण्यासाठी फलेरो यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे तृणमूलच्या माध्यमातून गोव्याचा आवाज राज्यसभेत गाजणार असून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपले वचन पूर्ण केल्याचे तृणमुलच्या नेत्यांनी सांगितले आहे.
आधीच झाली होता करार -
तृणमुल काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी राज्यभरात हातपाय पासरवायचे होते. त्यासाठी त्यांनी गोव्याची निवड केली. त्यातच विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याचाच फायदा घेऊन तृणमुलला राज्यात यायचे होते. त्यामुळेच तृणमुल अनुभवी नेतृत्वाच्या शोधत होती. त्यामुळे वेळीच फलेरो यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन कोलकत्त्याला जाऊन तृणमूलचा झेंडा खांद्यावर घेतला. ते अल्पावधीतच राज्यात ममतांच्या तृणमूलची नवीन सकाळ घडवून आणली. त्याचाच मोबदला म्हणून ठरल्याप्रमाणे फलेरो याना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली.
तरीही विधानसभा निवडणूक लढविणार -
राज्यसभेची खासदारकी मिळाली तरीही फलेरो न्हवेलीम मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. कारण विधानसभा निवडणुकीत पक्षाचे जेमतेम आमदार निवडून आले तरीही सत्ता स्थापन करण्यात तृणमुल काँग्रेस महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभेत एखादे मंत्रिपद वाट्याला आल्यास राज्यातच राहून 2024 च्या लोकसभेचीही तृणमुल काँग्रेस तयारी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा - GOA ELECTION : भाजपाचे 7 ते 8 आमदार काँग्रेसच्या वाटेवर - गिरीश चोदनकर