ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : प्रियोळ मतदारसंघावर कुणाचा झेंडा? सर्व पक्षांत होणार मतविभागणी - गोवा विधानसभा मतदान

गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी आता सुरु झाली आहे. उत्तर गोवा जिल्ह्यातील प्रियोळ मतदार संघावर मागील दोन निवडणुकांमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सत्ता होती. त्यानंतर अपक्ष उमेदवारावर मतदारांनी विश्वास दाखवला. यंदा मगोप जागा राखणार का? याबाबत उत्सुकता आहे.

Goa Assembly Election
Goa Assembly Election
author img

By

Published : Jan 21, 2022, 3:36 PM IST

पणजी (गोवा)- गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी आता सुरु झाली आहे. १४ फेब्रुवारीला राज्यात निवडणूक होणार आहे. उमेदवारीसाठी २१ ते २७ जानेवारी या काळात अर्ज भरता येणार आहेत. राज्यात एकूण ११ लाख ५६ हजार ४६४ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये २२९५ नवमतदार असणार आहेत. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर गोवा जिल्ह्यातील प्रियोळ (Priol Assembly Constituency )हा एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची पकड असल्याचे आतापर्यंत पाहायला मिळाले. मात्र गेल्या निवडणुकीत मतदारांनी अपक्ष उमेदवार निवडून दिल्यामुळे यंदा पुन्हा मगोप या मतदारसंघात बाजी मारणार का, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रियोळ मतदारसंघाची रचना -
प्रियोळ विधानसभा मतदारसंघात (Priol Assembly Constituency ) पोडा तालुक्यातील प्रियोल, कवेरिम, बोना, ओरगाव, कॅनडोला या गावांचा समावेश होतो. प्रियोळ मतदार संघाची मतदारसंख्या ३० हजार इतकी आहे. पुरुष मतदारांची संख्या १४ हजार ५७७ तर महिला मतदारांची संख्या १५ हजार इतकी आहे. सर्वसाधारणपणे ८९ टक्के मतदान केले जाते.

२०१२ विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी -
२००७ च्या विधानसभा निवडणुकी पाठोपाठ २०१२ची विधानसभा निवडणुकही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या पांडुरंग उर्फ दीपक ढवळीकर यांनी जिंकली होती. ढवळीकर यांना १२,२६४ मते मिळाली होती तर त्यांच्याविरोधातील गोविंद गावडे या अपक्ष उमेदवाराला दहा हजार १६४ मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस होती ज्यांना 1,625 मते मिळाली होती.

२०१७ विधानसभा निवडणूक -
२०१७मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे चित्र पालटले अपक्ष उभे राहिलेल्या गोविंद गावडे यांनी 15,149 मते घेत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या पांडुरंग उर्फ दीपक ढवळीकर यांचा पराभव केला. दीपक ढवळीकर यांना १० हजार ४६३ मते मिळाली तर तिसर्‍या क्रमांकावर आप उमेदवाराने झेप घेत ४५६ मते मिळवली.

यंदाही आप आणि काँग्रेस सोबत शिवसेनेचाही उमेदवार रिंगणात असल्याने मतांची विभागणी होऊन विजय कोणाच्या पारड्यात पडणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.