पणजी: गोव्यात बुधवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निकाल हाती यायला सुरवात झाली आहे. प्राथमिक अंदाजा नुसार बहुतेक ग्रामपंचायतीवर भाजप प्रणित पॅनलचे वर्चस्व दिसून येत आहे. या निवडणुकीत भाजप काँग्रेस सह आम आदमी पक्ष व गोव्यातील प्राधिक प्रादेशिक पक्षांनी पक्ष प्रणित पॅनल उभे केले होते. बुधवारी 186 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीचे कल सध्या हाती यायला सुरवात झाली आहे. अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतवर भाजपचे वर्चस्व दिसत आहे.
अनेक वॉर्डाच बहुरंगी लढत : भाजप खालोखाल काँग्रेस आम आदमी पक्ष व स्थानिक रेवोल्युशनरी गोवन व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष प्रणित पॅनलचे उमेदवारही विजयी होत आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होउ शकते. या निकाला नंतर 5038 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला समोर येणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आधी मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. अनेक वॉर्डाच बहुरंगी लढत झाल्याचे पहायला मिळाले होते.त्यामुळे विजयी होणारे उमेदवार किरकोळ मतांनी निवडून येताना पहायला मिळत आहेत. 12 तालुक्यांतील 21 केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत बुधवारी 186 ग्राम पंचायत साठी 1,464 प्रभागांमध्ये हे उमेदवार रिंगणात होते.
78.70 टक्के मतदान : राज्य निवडणूक आयोगाच्या माहिती नुसार पंचायत निवडणुकीत 78.70 टक्के मतदान झाले. एकूण 6,26,496 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उत्तर गोव्यात 81.45 टक्के मतदान झाले, तर दक्षिण गोव्यात 76.13 टक्के मतदान झाले. उत्तर गोव्यातील सातारी तालुक्यात सर्वाधिक 89.30 टक्के मतदान झाले. ग्रामपंचायतीमधून एकूण 64 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यापैकी 41 उत्तर गोव्यातील आणि 23 दक्षिण गोव्यातील आहेत. उत्तर गोवा जिल्ह्यात 97 पंचायती आहेत, ज्यात 2,667 उमेदवार रिंगणात आहेत, तर दक्षिण गोव्यातील 89 पंचायतींसाठी 2,371 इतरांनी निवडणूक लढवली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, उत्तर गोव्यात 3,85,867 आणि दक्षिण गोव्यात 4,11,153 मतदार आहेत.