पणजी (गोवा) - राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे राज्यातील बडे नेते दिगंबर कामत ( Congress leader Digambar Kamat ) भाजपच्या वाटेवर असून लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण ( Digambar Kamat will join the BJP Talk rife in Goa ) आले आहे. दिल्लीत जाऊन भाजप पक्षश्रेष्ठींची त्यांनी भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे यातून या चर्चेला उधाण आले आहे.
दिल्लीत पक्षश्रेष्ठीची घेतली भेट - राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे राज्यातील बडे नेते दिगंबर कामत भाजपच्या वाटेवर असून लवकरच ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कामात यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन भाजप पक्षश्रेष्ठी यांची भेट घेतली असून येत्या दोन दिवसात ते पुढील निर्णय घेणार आहेत. दिगंबर कामत हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. 2007 ते 2012 या काळात त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. 2012 पासून ते विरोधी पक्षात आहेत दरम्यान कामात यांच्या भाजपा प्रवेश चर्चेमुळे काँग्रेसच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणुकीत भाजपा उपमुख्यमंत्र्यांचा केला होता पराभव - गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जेष्ठ नेते दिगंबर कामत यांनी मडगाव मतदारसंघातून विजय मिळवलेला ( Digambar Kamat Won From Madgaon ) आहे. त्यांनी भाजपाचे उपमुख्यमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांचा पराभव केला आहे. मडगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दिगंबर कामत हे जवळपास 7 हजार 760 मतांनी विजयी झाले होते. गोवा हा अनेक वर्षे काॅंग्रेसचा गड होता. 2017 च्या निवडणुकीत काॅग्रेसमधुन आलेल्या अर्ध्या आमदारांच्या जोरावरच भाजपने सरकार स्थापन केले. काॅंग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले दिगंबर कामत यांनी विरोधीपक्ष नेत्याची जवाबदारी पार पाडली. यावेळी ते मडगाव मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणूक आलेले आहेत. मात्र ते भाजपात प्रवेश करणार आहेत या चर्चेने गोवा कॉंग्रेसचा जीव भांड्यात पडला आहे.