ETV Bharat / city

नाशिकमध्ये पावसामुळे चक्क मंडप टाकून रस्त्याचे काम सुरू... - मंडप

नाशिकमध्ये ञ्यंबक नाका ते अशोकस्तंभ स्मार्ट रस्त्याचे काम वेळेत पुर्ण झाले नाही. म्हणून ठेकेदारांना चक्क मंडप टाकून काम करावे लागत आहे. प्रशासनाने अनेक वेळा नोटिस देऊनही काम पुर्ण न झाल्याने ठेकेदारांना दंड ठोठावण्यात आला होता. ३१ ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदत दिल्याने ठेकेदाराने पावसातही काम पुर्ण व्हावे म्हणून ही शक्कल लढवली आहे.

पावसामुळे चक्क मंडप टाकून रस्त्याचे काम सुरू...
author img

By

Published : Aug 2, 2019, 5:24 PM IST

नाशिक - गेल्या २ वर्षांपासून नाशिककरांची डोकेदुखी ठरलेल्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ स्मार्ट रस्त्याचे काम वेळेत पुर्ण झाले नाही. म्हणून ठेकेदारांना चक्क मंडप टाकून काम करावे लागत आहे. संबंधीत ठेकेदारांना प्रशासनाने अनेक वेळा नोटीस दिल्या होत्या. त्यावर त्या ठेकेदारांना दंड देखील भरावा लागला. त्यामुळे भर पावसातही काम पूर्ण करण्यासाठी या ठेकेदारांनी अजब शक्कल लढवली असून, मंडप टाकून काम सुरू ठेवले आहे.

पावसामुळे चक्क मंडप टाकून रस्त्याचे काम सुरू...
आज सकाळपासून भर पावसात हे काम सुरू करण्यात आले. मात्र, पाऊस जास्त असल्याने मंडपातून पाणी रस्त्याच्या कामावर पडत आहे. त्यामुळे धावपळीत चाललेल्या कामाचा दर्जा कसा असेल यावर प्रश्नचिन्ह आहे. नाशिक महापालिकेची स्मार्ट सिटी अंतर्गत निवड झाल्यानंतर शहरातील त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ दरम्यान रस्त्याचे अवघ्या एक कि.मी. रस्त्याचे 'स्मार्ट रोड'मध्ये रूपांतर करण्यास प्रारंभ झाला आहे. या एक कि.मी. रस्त्यासाठी तब्बल 21 कोटी रुपये खर्च होणार आहेत. या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट अशी अनेक शासकीय कार्यालये असून तीन शाळा, दुकाने आणि घरं आहेत. अत्यंत रहदारीच्या या मार्गावरील रस्त्याचे काम दोन वर्षांपासून सुरू असून नाशिककरांनी काम वेळत पुर्ण न झाल्याने अनेक वेळा आंदोलने केली होती. 1 एप्रिलपासून या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला 36 हजार रुपये दररोज असा दंड सुरू आहे. काम करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे धावपळ करून कसेही हे काम पूर्ण करावे लागत आहे. स्मार्ट रोडच्या ठेकेदाराने ही अजब शक्कल लढविली असून सुमारे 500 मीटर अंतराचा मंडप टाकून भर पावसात काम सूरु ठेवले आहे. म्हणून हा विषय चर्चेचा ठरतो आहे.

Intro:दोन वर्षापासून नाशिककरांची डोकेदुखी ठरलेल्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ स्मार्ट रोड चे काम वेळेत पुर्ण न झाल्याने ठेकेदारांला प्रशासनाने अनेक वेळा नोटिसा दिल्या होत्या तसेच ठेकेदाराला दंड देखील भरावा लागला परतु संध्या नाशकात संततच्या पाऊसामुळे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराने अजब शक्कल लढविली असून चक्क मंडप टाकून काम सुरू ठेवले आहे.Body:आज सकाळ पासून भर पावसात मंडप टाकून हे काम सुरू करण्यात आले मात्र पाऊस जास्त असल्याने मंडपातुन पाणि रोडाच्या कामावर पडत आहे त्या मुळे धावपळीत झालेल्या कामाचा दंर्जा खालवनार आहे नाशिक महापालिकेची स्मार्ट सिटी अंतर्गत निवड झाल्यानंतर शहरातील त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ दरम्यान रस्त्याचे अवघ्या एक किलो मीटर रोडचे स्मार्ट रोडमध्ये रूपांतर करण्यास प्रारंभ झाला आहे अवघ्या एक किलोमीटर रस्त्यासाठी 21 कोटी रुपये खर्च करीत आहेConclusion:या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट अशी अनेक शासकीय कार्यलये तसेच तीन शाळा दुकाने आणि घर आहेत अत्यंत रहदारीच्या या मार्गावरील एक किलोमीटर रस्त्याचे काम दोन वर्षांपासून सुरू असून नाशिककरांनी काम वेळत पुर्ण न झाल्याने अनेक वेळा आंदोलने केली आहेत 1 एप्रिल पासून या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला 36 हजार रुपये दररोज असा दंड सुरू आहे आणि 31 ऑगस्ट अशी डेडलाईन देण्यात आली आहे.त्यामुळे धाव पळ करून कसेही हे काम पूर्ण करण्यासाठी स्मार्ट रोडच्या ठेकेदाराने अजब शक्कल लढविली असून सुमारे 500 मीटर अंतराचा मंडप टाकून भर पावसात काम सूरु केले आहे त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.