नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भावानंतर गुरुवारी पहिल्यांदाच महानगरपालिकेची महासभा सभागृहात बोलवण्यात आली. परंतु राज्य सरकारने जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे महासभा तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक मनपाची महासभा तहकूब-
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गेल्या वर्षभरापासून नाशिक महानगर पालिकेची महासभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत होती. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी जवळपास वर्षभरानंतर महापालिकेची महासभा ऑफलाइन पद्धतीने बोलवली होती. मात्र बुधवारी सायंकाळी राज्य शासनाने राज्यभरात जमावबंदी आदेश लागू केल्याने महासभा तहकूब करण्यात आली आहे. गुरुवारी सभेला सुरवात होताच राज्य शासनाच्या जमावबंदी आदेशामुळे ही महासभा तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा महापौर कुलकर्णी यांनी केली आहे. यावेळी सभागृहात सुमारे 25 नगरसेवक उपस्थित होते.
हेही वाचा- दिलासादायक! यंदा भारतीय कंपन्यांकडून सरासरी ७.३ टक्के होणार वेतनवाढ