ETV Bharat / city

अधिकचा किराणामाल भरण्यासाठी ग्राहकांनी गर्दी करू नये; दुकानदारांचे आवाहन - lockdown in nashik

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. मात्र, 14 एप्रिलला संपणाऱ्या या लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. यामुळे नागरिकांनी होलसेल किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

nashik news
ज्यादाचा किराणामाल भरण्यासाठी ग्राहकांनी गर्दी करू नये; दुकानदारांचे आवाहन
author img

By

Published : Apr 4, 2020, 7:20 PM IST

नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जारी केला आहे. मात्र, 14 एप्रिलला संपणाऱ्या या लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यातच सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजेसची भर पडल्याने नागरिकांच्या अस्वस्थतेत भर पडलीय. यामुळे नागरिकांनी होलसेल किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. एका महिन्याचा माल खरेदी करणारे नागरिक आता तीन महिन्यांचा किराणामाल एकाच वेळी भरत असल्याने अनेक ठिकाणी दुकानांध्येही धान्य टंचाई निर्माण झाली आहे.

अशातच नागरीकांना सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडलाय. ग्राहकांनी गरजेपुरतेच सामान भरावे,,तसेच साठेबाजी करून धान्याची टंचाई निर्माण करू नये, असे आवाहन दुकानदारांनी केले आहे.

...म्हणून भाव वाढले

संचारबंदीमुळे परराज्यातून ट्रकने येणारा किराणामाल विकत घेण्यासाठी दुकानदारांना ज्यादाचे पैसे मोजावे लागत आहेत. तसेच या वाहतूक करणाऱ्या ट्रकला पुन्हा जाण्यासाठी दुसरे भाडे मिळत नसल्याने दुकानदारांना अधिक रक्कम मोजण्याची वेळ आलीय. त्यामुळे काही प्रमाणात किंमती वाढल्याचे दुकानदारांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.