ETV Bharat / city

'कामगार विरोधी' धोरणांना विरोध करण्यासाठी नाशकात कामगार संघटनांचा भव्य मोर्चा !

सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आज बुधवारी देशभरातील विविध कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. नाशिक शहरात देखील अनेक कामगार संघटनांनी या संपात सहभाग घेत, भव्य मोर्चा काढला.

Various labor unions staged a protest in Nashik
नाशिकमध्ये कामगार संघटनांचा महामोर्चा
author img

By

Published : Jan 8, 2020, 6:44 PM IST

नाशिक - सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आज बुधवारी देशभरातील विविध कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. नाशिक शहरात देखील अनेक कामगार संघटनांनी या संपात सहभाग घेत, भव्य मोर्चा काढला. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरून काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो राज्य कर्मचारी सहभागी झाले होते.

नाशिकमध्ये कामगार संघटनांचा महामोर्चा

हेही वाचा... भारत बंद आंदोलन पेटले; स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून केला सरकारचा निषेध

नाशिक जिल्ह्यातील राज्य व केंद्र सरकारी सेवक, पोस्टल, शिक्षक, औद्योगिक कामगार, अंगणवाडी आशा सेवकी, महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत सेवक हे या संपात सहभागी झाले नाही. सुरक्षारक्षक देखील काळ्या फिती लावून काम करताना दिसून आले. महाराष्ट्र राज्य जागृत शिक्षक संघटनेच्या वतीने विविध मागण्याकरता शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते. शाळांना अनुदानाचा पुढचा टप्पा मिळावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षक मंजुरीचे निकष दुरुस्त करावे, शिक्षकेतर सेवकांचा आकृतिबंध पुनर्गठित करावा आदी मागण्यांसाठी शिक्षक संपात सहभागी झाले होते.

हेही वाचा... कामगार संघटनांचा देशव्यापी संप; मुंबईत शाळा, महाविद्यालयांसह वाहतूक सेवा सुरू

कामगार संघटनांनी देखील या मोर्चात शक्तिप्रदर्शन केले. केंद्र सरकार कामगार, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व सार्वजनिक क्षेत्र कवडीमोल किमतीत भांडवलदारांना विक्री करत असल्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहनही केले.

हेही वाचा... कोल्हापुरातील युनियन बँकेवर दरोडा; १६ कोटींचा ऐवज लंपास

या देशव्यापी संपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्स कम्युनिस्ट पक्ष या राजकीय पक्षांच्या संलग्न कामगार संघटना गव्हर्नमेंट एम्प्लॉईज फेडरेशन, सर्व बँक कर्मचारी, एलआयसी, जीआयसी, बीएसएनएल, सिव्हील एरीकेशन, डिफेन्स, बीपीसीएल, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगार संघटना, यासह विद्यार्थी संघटनांना मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

Intro:सरकारच्या कामगार विरोधी धोरणा विरोधात कामगार संघटनांचा नाशिक मध्ये भव्य मोर्चा...

Body:भाजप सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आज देश भरातील कामगार संघटनांनीही देशव्यापी संप पुकारत आंदोलनाची हाक दिली आहे..नाशिक शहरात देखील अनेक कामगार संघटनांनी संपात सहभाग घेत भव्य मोर्चा काढला, नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरून काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो राज्य कर्मचारी सहभागी झाले होते..

नाशिक जिल्ह्यातील राज्य व केंद्र सरकारी सेवक पोस्टल, शिक्षक,औद्योगिक कामगार ,अंगणवाडी, आशा सेवक, महानगरपालिका ,नगरपालिका व ग्रामपंचायत सेवक हे संपात सहभागी झाले नाही...सुरक्षारक्षकांनी देखील काळ्या फिती लावून काम करताना दिसून आले,महाराष्ट्र राज्य जागृत शिक्षक संघटनेच्या वतीने विविध मागण्यां करिता शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते,शाळांनाअनुदानाचा पुढचा टप्पा मिळावा,जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षक मंजुरीचे निकष दुरुस्त करावे,शिक्षकेतर सेवकांचा आकृतिबंध पुनर्गठित करावा आदी मागण्या साठी शिक्षक संपात सहभागी झाले होते..

कामगार संघटनेने देखील या मोर्चात शक्तिप्रदर्शन केलं, केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व सार्वजनिक क्षेत्र कवडीमोल किमतीत भांडवलदारांना विक्री करत असल्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवत कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं आवाहन केलं..या देशव्यापी संपात शिवसेना ,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्स कम्युनिस्ट पक्ष या राजकीय पक्षांच्या संलग्न कामगार संघटना गव्हर्नमेंट एम्प्लॉईज फेडरेशन,सर्व बँक कर्मचारी, एलआयसी, जीआयसी, बीएसएनएल, सिव्हील एरीकेशन, डिफेन्स, बीपीसीएल, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगार संघटना, या सह विद्यार्थी संघटनांना मोर्चात सहभागी झाल्या होत्या...

कपिल भास्कर चौपाल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.