नाशिक: नाशिक शहरातील आगर भागात घराच्या शेजारी असलेल्या पाण्याचा हौदात पडून दोन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजता च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या चिमुकल्याचे नाव आदि चव्हाण असे होते. आगर भागातील पंचकृष्ण बंगला येथे वास्तव्यास असलेले रमेश चव्हाण यांचा तो मुलगा होता. सायंकाळी घराबाहेर खेळत असताना ताेल गेल्याने तो जवळच्या हौदातील पाण्यात पडला. बराच वेळ झाला तरी मुलगा दिसत नसल्याने आई सपना चव्हाण यांनी त्याचा शोध घेतला असता तो हौदात पडलेला दिसला. नाका तोंडात पाणी गेलेल्या स्थितीतच त्याला तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तपासणीनंतर डाॅक्टरांनी त्यास मृत घाेषित केलेे.
Child Died : हौदात पडून दोन वर्षीय मुलाचा मृत्यू - child died after drowning
नाशिक शहरातील आगर भागात घराच्या शेजारी असलेल्या पाण्याचा हौदात पडून दोन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजता च्या सुमारास घडली.
![Child Died : हौदात पडून दोन वर्षीय मुलाचा मृत्यू मुलाचा बुडून मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16493836-411-16493836-1664344487170.jpg?imwidth=3840)