दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथे विहरीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटणा घडली आहे. दिंडोरी तालुक्यातील विळवंडी (नाईकवाडी रस्त्या) लगत पारधी कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील पदमा उत्तम पारधी (इयत्ता 5 वी) व फशाबाई उत्तम पारधी (इयत्ता 4 थी) यांचा विहरीत पडून मृत्यू झाला आहे.
जीव वाचवण्यासाठी ठरल्या अयशस्वी-
शनिवारी सकाळी ठीक 7 वाजता या दोन बहिणी दर दिवशीप्रमाणे पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या. दरम्यान, पाणी काढत असताना एका बहिणीचा पाय घसरला व ती विहिरीत पडली. आपली बहीण विहिरीत पडली हे बघून दुसऱ्या बहिणीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु यात त्या आपला जीव वाचवण्यासाठी अयशस्वी ठरल्या. व काळाने घाला घातला. यात त्या दोन्ही बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दोन्ही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू-
यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण व हवालदार घटनास्थळी दाखल झाले. व दोनही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्या दोन्ही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
या प्रकरणी लवकरात लवकर शासनाने मदत करावी, अशी मागणी मुलींच्या नातेवाईकांडून केली जात आहे. या प्रकाराची दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण व पोलीस हवालदार करत आहे.
हेही वाचा- व्हॅलेंटाईन विशेष : प्रेमा तुझा 'राजकीय' रंग कसा?