ETV Bharat / city

रेमडेसिवीरची चढ्या दराने विक्री करताना नाशिकमध्ये दोघांना अटक

अंबड पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून दोघांना अटक केली आहे. इंजेक्शन घेऊन राणेनगर बोगदा येथे येत असताना, पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करत त्यांना रंगेहाथ अटक केली. 4 हजार रुपयांचं एक इंजेक्शन 24 हजार रुपयांना ते विकणार होते.

रेमडेसिवीरची चढ्या दराने विक्री करताना नाशिकमध्ये दोघांना अटक
रेमडेसिवीरची चढ्या दराने विक्री करताना नाशिकमध्ये दोघांना अटक
author img

By

Published : May 9, 2021, 12:58 PM IST

नाशिक : रेमडेसिवीरच्या दोन इंजेक्शन्सची काळ्या बाजारात तब्बल 48 हजार रुपयांना विक्री करताना नाशिकच्या अंबड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 4 हजारांचे एक इंजेक्शन 24 हजार रुपयांना हे दोघे विकणार होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

रेमडेसिवीरची चढ्या दराने विक्री करताना नाशिकमध्ये दोघांना अटक
24 हजारांना एका रेमडेसिवीरची विक्री!

नाशिक जिल्ह्यात सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असताना, काही महाभाग सर्रासपणे या रेमडेसिवीरचा काळाबाजार करताना दिसून येत आहेत. अंबड पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून दोघांना अटक केली आहे. इंजेक्शन घेऊन राणेनगर बोगदा येथे येत असताना, पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करत त्यांना रंगेहाथ अटक केली. 4 हजार रुपयांचं एक इंजेक्शन 24 हजार रुपयांना ते विकणार होते. असे दोन इंजेक्शन 48 हजार रुपयांना विकणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. यात दोन संशयित आरोपींसह एक कारही ताब्यात घेण्यात आली आहे.

पोलिसांची सापळा रचून कारवाई
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणेनगर बोगद्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री दोन इसम दोन रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात 48 हजार रुपयांना विकणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक सुरेश साहेबराव देशमुख यांना कळविले आणि सदर प्रकरणी छापा टाकण्यासाठी देशमुख यांनी अंबड पोलिसांनी बोलवून घेतले. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून इंजेक्शन देणाऱ्या इसमाला त्याच्या मोबाईलवर कॉल केला. बनावट ग्राहकाने संशयितांच्या होंडा सिटी ( एम एच 04 ए वाय 3751 ) कार मध्ये बसलेल्या व्यक्तींना पैसे देऊन इंजेक्शन मागितले. यात 4 हजार रुपये किंमतीचे एक रेमडेसिवीर इंजेक्शन 24 हजारांना ते विकत होते. याच वेळी अंबड पोलिसांनी अमोल रमेश देसाई( वय 36 , रा . विनयनगर , इंदिरानगर , नाशिक ) व निलेश सुरेश धामणे ( वय 41 , रा . आसावरी चेंबर्स , कॉलेज रोड , नाशिक ) यांना रंगेहात अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चारचाकी कार, 2 इंजेक्शन व काही रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात अत्याावश्यक सेवा वस्तु कायदा, भादंवि कलम 434 / 420 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.