ETV Bharat / city

नाशिककरांची दिवाळी होणार दणक्यात साजरी, महापालिकेच्या सभेत फटाके बंदीचा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळला - दिवाळी

दिवाळीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्रीवर बंदी घालण्याच्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी पत्रक काढले होते. या पत्रात फटारे बंदीचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेव्या, असा आदेशही होता. यामुळे नाशिक महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. यामुळे नाशिकरांची दिवाळी यंदाच्या वर्षी पूर्वीप्रमाणे दणक्यात साजरी होणार आहे.

नाशिक महापालिका
नाशिक महापालिका
author img

By

Published : Oct 21, 2021, 3:41 PM IST

नाशिक - दिवाळीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्रीवर बंदी घालण्याच्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी पत्रक काढले होते. हे पत्रक उत्तर महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांना देण्यात आले होते. आता कोरोनाचे प्रमाण कमी होत असताना सण येत आहेत. त्यामुळे फटाकेबंदीच्या प्रस्ताव चुकीचा असल्याचे सांगत, नाशिक महापालिकेत झालेल्या सभेत सर्वांनुमते विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सादर केलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यामुळे यंदा फटाके वाजवण्याची मुभा असणार आहे.

बोलताना महापौर

नाशिककरांची दिवाळी दणक्यात

फटाके बंदीच्या निर्णयामुळे फटाके विक्री करणारे तसेच नागरिकांमध्ये काहीशी नाराजी होती. पण, याबाबत आज (दि. 21) नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत मांडलेला प्रस्ताव सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने फेटाळला आहे. नाशिककरांची दिवाळी पूर्वीप्रमाणे दणक्यात साजरी होणार आहे.

विभागीय आयुक्तांनी फटाके बंदीचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांनीच घेण्याबाबत दिले होते आदेश

पालकमंत्री छगन भुजबळांच्या मध्यस्थीनंतरही फटाके बंदीची टांगती तलवार कायम होती. मात्र, आता महासभेत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. फटाके बंदीचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांनीच घ्यावा, असा विभागीय आयुक्तांनी आदेश दिला होता. कोरोनामुळे आधिच व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्यावर्षीही फटाक्यांवर बंदी असल्याने वापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी फटाके बंदीच्या संदर्भात पत्रक काढल्याने व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता उद्भवली होती. फटाके विक्री करुन उदर्निवाह करणाऱ्यांसमोरही मोठे संकट होते. पण, आता फटाके बंदीचा प्रस्ताव फेटाळल्याने या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात कोविड-19 चा एक डोस घेऊन विद्यार्थी महाविद्यालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.