नाशिक - भगूर पोलीस चौकी जवळील रस्त्याच्या दुभाजकावर शॅमेलिऑन जातीचा सरडा आढळला असून या सरड्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या भागात सरडा आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला दिली.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन सरड्याला ताब्यात घेतले. वनरक्षक विजय पाटील व वन मजूर यांच्या सह प्राणीमित्र रोहन जगताप,आशिष पवार,मंगेश परदेशी यांनी ह्या सरड्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.