येवला - प्रशासन व पोलिसांच्या वतीने वेळोवेळी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना नियमाचे पालन करा, असे सांगण्यात येत होते. मात्र तरीही नागरिक ऐकत नसल्याने व विनाकारण फिरत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी अशा नागरिकांना दंडुक्याच्या प्रसाद देण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांना दंडुक्याचा प्रसाद
राज्यात संचारबंदी लागू झाली मात्र येवल्यातील पोलिसांनी कारवाई सौम्य ठेवत नागरिकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले होते. तरी देखील येवलेकरांचा बेजबाबदारपणा काही कमी होत नसल्याने व सकाळच्या बारानंतरही नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आल्याने येवला शहर पोलिसांनी अशा नागरिकांना चोप देण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पण दंडुक्याच्या प्रसाद मिळत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहाय्यक निरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस कर्मचारी व होमगार्ड आदी यावेळी कारवाई करत होते.
हेही वाचा - 'तौक्ते’ चक्रीवादळ गोवा-सिंधुदुर्गच्या दिशेने; गोव्यात एनडीआरएफ दाखल; मुंबईत वाऱ्यासह पाऊस
हेही वाचा - राजा तुपाशी, प्रजा उपाशी... भेंडवळच्या घटमांडणीचे वर्तविले भाकित