ETV Bharat / city

Shivaji Maharaj Jayanti 2022 : शिवजयंती निमित्त साकारली 131 किलोची वाघनखे तर 92 किलोची कट्यार - Shiva Jayanti 2022

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त नाशिकच्या छत्रपती सेनेतर्फे 131 किलो वजनाची वाघनखे तर 92 किलो वजनाची कट्यार साकारण्यात आली आहे. (Shivaji Jayanti 2022 In Nashik) या भव्य वाघनखे, कट्याची विश्वविक्रमात नोंद होणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे.

131 किलो वजनाची वाघनखे
131 किलो वजनाची वाघनखे
author img

By

Published : Feb 15, 2022, 9:07 AM IST

Updated : Feb 16, 2022, 7:03 AM IST

नाशिक - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त नाशिकच्या छत्रपती सेनेतर्फे 131 किलो वजनाची वाघनखे तर 92 किलो वजनाची कट्यार साकारण्यात आली आहे. ((Shivaji Jayanti Nashik) या भव्य वाघनखे, कट्याची विश्वविक्रमात नोंद होणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे.

व्हिडिओ

प्रतिकृती शिवाजी महाराज स्मारकात ठेवण्यात येणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी वेगवेगळ्या भव्य प्रतिकृतीच्या माध्यमातून विश्वविक्रम करणाऱ्या छत्रपती सेनेतर्फे या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध करताना वापरलेल्या वाघनखे याची भव्य प्रतिकृती साकारली आहे. ही सहा फूट रुंद व अडीच फूट उंचीची लोखंडी वाघनखे असून त्याचे वजन 130 किलो आहे. (Waghankhe and 92 kg katyar were made In Nashik) त्यासोबतच लोखंड व पीतळापासून आठ फूट उंचीची 92 किलो वजनाची कट्यार साकारण्यात आली आहे. शिवजन्मोउत्सवा निमित्ताने नागरिकांना भव्य वाघनखे, कट्यार बघता यावी यासाठी 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी सीबीएस येथील शिवाजी महाराज स्मारकात ठेवण्यात येणार आहे.

याआधी देखील विश्वविक्रम

छत्रपती सेनेतर्फे या आधी 2019 मध्ये शिवाजी महाराजांचा 13 फूट उंच जिरे टोप, 2020 मध्ये 131 किलो वजनाची 13 फूट लांब भवानी तलवार 2021 मध्ये 71 किलो वजन असलेला शिवाजी महाराजांची प्रतीमा असलेला टाक साकारण्यात आला होता. या सर्वांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

महिलांसाठी खास कार्यक्रम

शिवजयंती उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, राजमाता जिजाऊ, राणी सईबाई, राणी येसूबाई, राणी ताराराणी यांच्या पारंपारिक वेशभूषा करून येणाऱ्या महिन्यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तसेच, यंदा पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला महिलांकडून पाळणा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

हेही वाचा - Shiv Sena Press Conference Today : कोण आहेत भाजपचे साडेतीन लोक? शिवसेनेची आज पत्रकार परिषद

Last Updated : Feb 16, 2022, 7:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.