ETV Bharat / city

नाशिक: पोलीस चौकीतच लाच स्वीकारताना तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक - Nashi ACB arrest police in bribe case

सातपूर पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातामधील संशयिताकडे अटक टाळण्याकरिता पोलिसांनी सुमारे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली

सातपूर पोलीस ठाणे
सातपूर पोलीस ठाणे
author img

By

Published : Feb 17, 2021, 10:09 PM IST

Updated : Feb 17, 2021, 10:31 PM IST

नाशिक - पोलीस विभागात भ्रष्टाचार किती बोकाळला आहे, हे दाखवून देणारी घटना समोर आली आहे. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील पोलीस चौकीत तीन पोलिसांना लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.

सातपूर पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातामधील संशयिताकडे अटक टाळण्याकरिता पोलिसांनी सुमारे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर त्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार अर्जाची दखल घेत चौकशी करून खात्री केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सातपूर पोलीस चौकीत रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला.

चौकीतच लाच स्वीकारताना तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक

हेही वाचा-चालत्या ट्रकमध्ये एक लाख १९ हजार रुपयांची लूट; दोघांना अटक

13 हजारांची रक्कम घेताना पोलीस सापडले रंगेहात

संशयित पोलीस नाईक हिरामण गणपत सोनवणे, सारंग एकनाथ वाघ, शिपाई राहुल पोपट गायकवाड या तिघांनी तक्रारदारकडून ठरल्याप्रमाणे 25 हजारांपैकी 13 हजारांची रक्कम स्वीकारली. यावेळी पथकाने रंगेहात त्यांना अटक केली आहे. उर्वरित 12 हजारांची रक्कम बुधवारी स्वीकारण्याचे निश्चित करण्यात आले होते. दरम्यान. या तिघा संशयित लाचखोर पोलिसांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-सीमा शुल्क विभागाने सिंधुदुर्गात पकडली ३२ लाखांची दारू

यापूर्वी उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नारायण बापुनगर पोलीस चौकीत लाचेची रक्कम स्वीकारताना काही महिन्यांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. मात्र, एकाचवेळी तिघा पोलिसांना लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सुत्रांनी सांगितले. लाचखोरीचे सर्वाधिक प्रमाण महसूल व पोलीस खात्यात असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईच्या आकडेवारिवरुन यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. काही ठराविक लाचखोर पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस खात्याची प्रतिमा मालिन होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Last Updated : Feb 17, 2021, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.