ETV Bharat / city

Nari Shakti : उद्योजिका चेतना पवार यांचा मशरूम उद्योगातील यशस्वी प्रवास - Healthy Mushroom

गेल्या काही वर्षांपासुन नागरीक स्वत:च्या स्वास्थ्याबाबत फारच जागृक झाल्याने,त्यांच्या आहारातील पौष्टीक पदार्थांचा समावेश वाढला आहे. काही महत्वाच्या पौष्टीक पदार्थांमध्ये (Healthy Mushroom) अळिंबी म्हणजेच मशरूमचा (mushroom) देखील समावेश होतो. त्यामुळे सध्या मशरूमला प्रचंड मागणी आहे. अश्यातच नाशिकच्या (Nari Shakti) महिला उद्योजिका चेतना पवार (Entrepreneur Chetna Pawar) यांनी देखील, 25 वर्षांपासून मशरूम उद्योगात आपली पाळेमुळे घट्ट रोवली (successful journey in mushroom industry) आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर जाणुन घेऊया नारी शक्ती विषयी.

Healthy Mushroom
उद्योजिका चेतना पवार
author img

By

Published : Aug 10, 2022, 5:48 PM IST

Updated : Aug 10, 2022, 7:50 PM IST

नाशिक : नाशिकच्या महिला चेतना पवार (Entrepreneur Chetna Pawar) या आज एक यशस्वी (Nari Shakti) महिला उद्योजिक म्हणून ओळखल्या (successful journey in mushroom industry) जातात. पती किरण पवार यांना त्यांची खंबीर साथ आहे. गेल्या 25 वर्षांपासून त्या (अळिंबी) मशरूम (mushroom) उद्योगात कार्यरत आहे. सुरवातीच्या काळात अनेक आव्हानांशी सामना करतांना सातत्य, मेहनत, बाजारपेठांचा अभ्यास करत, त्यांनी आज नाशिकसह इतरही राज्यात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे.

चेतना आणि किरण पवार दाम्पत्य हे मूळचे नगर जिल्ह्यातील लोणी (ता.राहाता) येथील आहे. गेल्या 26 वर्षांपासून ते नाशिक मध्ये वास्तव्यास आहे. किरण यांनी रासायनिक अभियांत्रिकी शाखेची पदविका पूर्ण केली आहे. नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणून, पवार दाम्पत्याने भांडवल नसताना; घरच्यांकडून 15 हजार रुपये उसणे घेतले. 1998 मध्ये कमी खर्चात टाकाऊ घटकांपासून शेड उभे केले. आणि तेथून त्यांचा प्रवास सुरू झाला. सुरवातीला त्यांनी मशरूम शेती करत नागरिकांना मशरूम चे फायदे (Healthy Mushroom) सांगण्यास सुरवात केली. आणि त्यांना यात यश मिळत गेले. विक्री कौशल्यातून हळूहळू पुढे जात त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. मशरूमची शेती करुन, सध्या राज्यासह परराज्यातील सुमारे 300 व्यावसायिकांना मशरूम बीज ते पुरवतात.

मशरूमचे आहारातील महत्त्व (Healthy Mushroom) : पवार दाम्पत्याने मशरूम व्यवसाय सुरू केला. तेव्हा त्याबाबत नागरिकांना फारशी माहिती नव्हती. सुरुवातीला उत्पादन सुरू झाल्यानंतर स्थानिक बाजारात मशरूमला मागणी नव्हती. त्यामुळे त्यांच्या समोर अनेक अडचणी आल्यात. मात्र व्यवसायातील सातत्यपणा, मेहनतीच्या जोरावर पवार दांपत्याने ग्राहकांना मशरूमचे आहारातील महत्त्व समजावून सांगण्यास सुरुवात केली.अशात चेतना पवार यांनी मशरूमचे रोल, बिर्याणी, बिस्किटे, मशरूम पुलाव, पापड, वडी अशा विविध पाककृती बनवून; त्याचे आहारातील महत्व पटवून दिले. त्यांच्या या सर्व प्रयत्नांमुळे त्यांचे ग्राहकांचे मोठे नेटवर्क तयार झाले.

सध्याची करार स्वरुपातील शेती : नाशिकमध्ये व्यवसाय सुरू झाल्यानंतर स्पॉनची मागणी वाढत गेली. त्यामुळे त्यांनी उत्पादन क्षमता वाढविली. सोबत कुशल मनुष्यबळ उभे केले. या माध्यमातून देशी प्रकारातील धिंगरी, बटण, मिल्की व पॅडी स्ट्रॉ, तसेच परदेशी प्रकारात 'शिताके' मशरूम व औषधनिर्मितीसाठी आवश्यक मशरूम बियाणे उत्पादन व विक्री सुरू केली. यातून शेतकऱ्यांन सोबतच्या करार पध्दतीच्या व्यवसायाला मोठा वाव मिळाला. सध्या राज्य व परराज्यासह 300 मशरूम उत्पादकांसोबत करार पद्धतीने शेती केली जाते. शेतकऱ्यांना स्पॉन(बियाणांचा) पुरवठा करून, त्यांच्याकडून मशरूमची खरेदी करण्यात येते. आता त्यांची प्रति महिना स्पॉन विक्रीक्षमता 20 टन असून; प्रतिकिलो 80 रुपये दराने विक्री केली जाते.

या ठिकाणी होतो पुरवठा : नाशिक सह गुजरात, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, लोणी, शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, औरंगाबाद, पुणे, सुरत आदी ठिकाणी मशरूम विक्री केली जाते. तसेच मुंबई, पुणे येथील व्यापारी, विमानसेवा, पंचतारांकित हॉटेलसाठीही नाशिक मधून मशरूम पुरवठा केला जातो.

आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार : चेतना पवार यांनी करार पद्धतीने उत्पादकांचे नेटवर्क तयार करतांना, प्रामुख्याने आदिवासी बाहुल भाग असलेल्या पेठ, इगतपुरी, सुरगाणा, अकोले, नवापूर या तालुक्यांतील आदिवासी शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण दिले. त्यांना कमी खर्चात उत्पादन साहित्य व कमी दराने बियाणे पुरवठा करुन; उत्पादित मशरूम रास्त दराने खरेदी करण्यात येते. या माध्यमातून आदिवासी नागरीकांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.

हेही वाचा : Nari Shakti : यवतमाळच्या संगीता सव्वालाखे यांची जैविक उत्पादनाच्या निर्मिती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल

Last Updated : Aug 10, 2022, 7:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.