ETV Bharat / city

Murder of BJP office bearer : युनियनच्या वादातून भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या, सहा तासात संशयित गजाआड - भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या

नाशिकमध्ये कामगार संघटनेच्या युनियनच्या अस्तित्वाच्या वादातून एका भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या ( Murder of BJP office bearer ) केली आहे. याप्रकरणातील संशयित आरोपीला सातपूर पोलिसांनी ( suspect arrested by satpur police ) अवघ्या सहा तासांत गजाआड केले आहे.

Murder of BJP office bearer
भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या
author img

By

Published : Nov 27, 2021, 12:41 PM IST

Updated : Nov 27, 2021, 12:49 PM IST

नाशिक - सातपूर येथील एका कंपनीत कामगार संघटनेतील युनियनच्या अस्तित्वावरुन दोन संघटनांमध्ये वाद सुरू आहे. या वादात एका पदाधिकाऱ्याने भाजपाच्या मंडल अध्यक्षाची हत्या केल्याची ( Murder of BJP office bearer ) घटना शुक्रवारी सकाळी सातपूर मधील कार्बन नाका येथील म्हसाेबा मंदिराजळळ घडली. या प्रकरणात सातपूर पाेलिसांनी मुंबईकडे पळण्याच्या तयारीत असलेल्या संशयित मारेकरी पदाधिकाऱ्यास कल्याण ते मुंब्राच्या दरम्यान ताब्यात घेऊन अटक ( suspect arrested by satpur police ) केली. विनायक उर्फ विनाेद बर्वे असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त विजय खरात यांची प्रतिक्रिया

हत्येच्या घटनेवरून भाजपा आक्रमक -

पूर्वी विनायक बर्वे हा भाजपाचाच पदाधिकारी होता. गेल्या महिन्याभरापूर्वी याने भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बर्वे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. सातपूरच्या एका कंपनीत भाजपा प्रणित कामगार संघटना कार्यरत असताना या युनियनचा पूर्वश्रमीचा पदाधिकारी विनोद बर्वे बाहेर पडला व त्याने नविन युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याने कंपनीने त्याला कामावरुन कमी केले हाेते. उपजिविकेसाठी त्याने नवी युनियन स्थापन करण्याचा रेटा सुरु केला. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाराष्ट्र वंंचित कामगार संघटनेची स्थापना करण्याचा प्रयत्न करत असताना भाजपा व राष्ट्रवादीच्या संघटनांत वाद तयार झाला. याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्जही दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी समज दिल्यावर वाद तात्पुरता शमला हाेता. मात्र, त्याची धग कायम होती. मृत अमोल इघे हा भाजपाचा सातपूर मंडल अध्यक्ष होता. तो नेहमी विनोदला समजावायचा. मात्र दोघांचा वाद मिटत नव्हता. शुक्रवारी सकाळी ईघे कार्बन नाका येथील म्हसाेबा मंदिराजवळील कंपनीच्या कामगारांना भेटण्यासाठी निघाले असता, यातील काही सहकाऱ्यांशी त्यांची भेट झाली. त्यात चर्चेतून वाद झाला. वादाचे पर्यावसान त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाला. एकाने त्यांचा गळा चिरल्याने ते जखमी अवस्थेत मंदिराजवळ पडले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या घटनेनंतर भाजपाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यांनी सकाळी सातपूर पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदाेलन केले. या हत्येने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांत संतापाचे वातावरण हाेते.

४ दिवसात नाशिकमधील तिसरी हत्या -

पंचवटीत गुरुवारी एका भाजी विक्रेत्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पूजा आंबेकर या महिलेची देखील तिच्याच दीराने हत्या केली होती. काही दिवसांपूर्वीच जामीनावर सुटलेला म्हसरुळ येथील सराईत गुन्हेगाराची त्याच्याच सहकाऱ्यांनी हत्या केली होती. लागाेपाठ तीन खुनाच्या घटना घडल्याने पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

२४ तासांत आरोपी अटक -

दरम्यान इघे याच्या हत्येनंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले. त्यांनी पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी केली. शहरात वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यात पोलीस असमर्थ ठरल्याचा आरोप केला. आरोपीला तातडीने ताब्यात घ्यावे तरच शव ताब्यात घेणार असल्याची भूमिका पदाधिकारी व कुटुंबीयांनी घेतली. जिल्हा शासकीय रुग्णालयातून सर्वांनी मोर्चा सातपूर पोलीस ठाण्याकडे वळवला. याठिकाणी सातपूर पोलीस ठाण्याच्या आवारातच ठिय्या मांडून पदाधिकार्‍यांनी आयुक्तांना पाचारण करण्याची मागणी केली व पोलीस आयुक्तांना हटवण्याची मागणी लावून धरली. २४ तासात आरोपी अटक करण्याच्या आश्वासनावर आंदोलन थांबवण्यात आले व शवही ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा - Whale trafficking - मुंबईत 15 कोटींच्या अंबरग्रीससह, 1 आरोपीला अटक

Last Updated : Nov 27, 2021, 12:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.