ETV Bharat / city

Matoshri in Maharashtra: मातोश्री हेच शिवसेनेचं हायकमांड - संजय राऊत - Sanjay Raut

महाराष्ट्रातील भाजपचे मुख्यमंत्री असून ते दिल्लीला गेले आहे. मातोश्री (Matoshri is the Shiv Senas high command) हेच शिवसेनेचं हायकमांड आहे दिल्ली नाही, या शब्दात शिवसेना नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

MP Sanjay Raut
खा.संजय राऊत
author img

By

Published : Jul 9, 2022, 1:28 PM IST

नाशिक : आपल्या कठोर व स्पष्ट वक्तव्याने सदैव चर्चेत असणारे शिवसेना नेते खा.संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील भाजपचे मुख्यमंत्री असून ते दिल्लीला गेले आहे. मातोश्री हेच शिवसेनेचं हायकमांड ((Matoshri is the Shiv Senas high command)) आहे. दिल्ली नाही, असे यावेळी राऊत म्हणाले. हाँटेल एक्सेप्रेस ईन येथे ते बोलत होते. राज्यात ठाकरे सरकार पाय उतार होताच, सीमा भागात मराठी माणसांवर अत्याचार सुरू झाले. कारण कर्नाटकात भाजपचा मुख्यमंत्री आहे. आणि महाराष्ट्रातही भाजपचा मुख्यमंत्री आहे. बेळगाव आणि सीमा भाग केंद्रशासित करावा, यासाठी त्यांनी प्रधानमंत्री व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून; योग्य तो निर्णय घेऊनच राज्यात परत यावं, असा टोला राऊत यांनी यावेळी लगावला. दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री भाजपचे आहे. शिवसेनेचे नाही.

द्रोपदी मुर्मू या आदिवासी असल्याने त्या राष्ट्रपती व्हाव्यात, अशी सर्वांचीच इच्छा आहे. याबाबत पक्ष प्रमुख योग्य तो निर्णय घेतील. दिल्लीत खासदारांची बैठक झाली असेल. कारण, रात्री विचारांचं आदान प्रदान वाढलं आहे. शिवसेनेचे खासदार भाजपच्या संपर्कात आहे. हे तुमचे सोर्सेस आहे, हे कोणी जाहीर केलं का ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा : MLA Aditya Thackeray : शरद पवारांनी शिवसेनेला संपवल्याचा आरोप; वाचा काय म्हणाले आदित्य ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.