नाशिक - राज्यभरातून वाढती विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. यामुळे पुन्हा भारनियमनाचे संकट निर्माण झाले आहे. याचा फटका नाशिककरांनाही बसत असून शहरात सुमारे तीन ते साडेतीन तासांचे भारनियमन होत आहे. त्यामुळे एक उन्हाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
भारनियमनाचे वेळापत्रक आणि परिसर - सोमवार ते बुधवार सकाळी 9 ते 10.45 आणि दुपारी 16.15 ते सायंकाळी 7.15 पर्यंत, तर गुरुवार ते रविवारी 7.30 ते 9 आणि दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.15 पर्यंत शहरातील उंटवाडी, महात्मानगर, सावरकर नगर अश्विन नगर, विजयनगर, पी अॅन्ड टी कॉलनी,नवीन साधुग्राम, माघ सेक्टर, चव्हाण मळा, सहदेव नगर, येथे भारनियमन होणार आहे. त्याचप्रमाणे उत्तमनगर, एकतानगर, कुलकर्णी कॉलनी, त्रिमूती चौक, पंचक, गायत्रीनगर, पंचवटी क्रीडा संकुल, टिळकवाडी या ठिकाणी सोमवार ते बुधवार सकाळी साडेसात ते साडेनऊ गुरुवार ते रविवार सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत भारनियमन होत आहे.
दुपारीदेखील दोन आणि चार वाजता दीड तासांचे भारनियमन - सोमवार ते बुधवार सकाळी 7.30 ते 9 आणि दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.15 पर्यंत, तर गुरुवार ते रविवारी सकाळी 9 ते 10.45 आणि दुपारी 16.15 ते सायंकाळी 5.45 या कालावधीत कृषीनगर, विद्याविकास सर्कल, पाटील कॉलनी, सदगुरू नगर, राजेबहाद्दर, उदोजी मराठा पवननगर, राणेनगर, गंगाघाट, या भागात भारनियमन होत आहे. दुपारीदेखील दोन आणि चार वाजता दीड तासांचे भारनियमन होणार आहे.
या ठिकाणी होणार तीन-तीन तासांचे भारनियमन - सोमवारी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा व दुपारी चार ते सहा या वेळेत, तसेच गुरुवार ते रविवार सकाळी साडेसात ते साडेनऊ, तसेच दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार या वेळेत म्हसरूळ, पेठरोड, गोरक्षनगर, अशोकस्तंभ, आरटीओ, विशाल पॉईंट, एसटी कॉलनी, अमृतधाम, राममंदिर, सातपूर या ठिकाणी भारनियमन होणार आहे.तसेच शहरातील कलानगर, कालिकानगर, सिंहस्थनगर, साईनगर, रविवार कारंजा, गोविंदनगर येथे सोमवार ते बुधवार सकाळी 6 ते 8.30, दुपारी 1.45 ते सायंकाळी 6.30 या कालावधीत भारनियमन होणार आहे.गोविंदनगर, मोरवाडी,गंजमाळ, लेखानगर, ठक्कर बाजार, येथेही सकाळ सायंकाळी भारनियमन होणार आहे. सारडा सर्कल, औरंगाबाद रोड, जुने नाशिक, बुधवारपेठ, भद्रकाली मार्केट, दूधबाजार या ठिकाणी देखील सकाळ सायंकाळी तीन-तीन तासांचे भारनियमन होणार आहे.