नाशिक - पंढरपूर आणि कोल्हापूर मंदिरापाठोपाठ आता नाशिकच्या सप्तश्रुंगी देवी मूर्तीच्या जतन संवर्धनाला विरोध होऊ लागला आहे. देवीच्या मूर्तीचे काम ज्या संस्थेला देण्यात आले आहे, त्यांनी याेग्य हमी पत्र द्यावे. ( Idol Work In Saptashringi Temple ) तसेच, ट्रस्टकडून मूर्तीचे संवर्धन करण्याचे कारण देत मंदिर ४५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय एकतर्फी असून ट्रस्टविराेधात न्यायालयात जाऊ असही ते म्हणाले आहेत. संवर्धनाचे काम हाती घेतलेच असल्याने ते काम पूर्णत शास्त्राेक्त व परिपूर्ण करण्याचे हमीपत्र द्यावे असही महंत ऋषिकेश आणि त्र्यंबकेश्वर मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे म्हणाले आहेत.
सप्तश्रृंगी मंदिरातील मूर्तीला कामा दरम्यान इजा झाली असावी - साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ म्हणून ओळख असलेले वणी येथील सप्तशृंगी देवी मंदिर हे मूर्ती संवर्धन व अन्य देखभालीच्या कामासाठी ४५ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टतर्फे घेण्यात आला. पण आता हाच निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अचानक देवीच्या मूर्ती संवर्धनाची गरज का भासली. कुणाच्या सांगण्यावरून हे काम करण्यात येत आहे. आम्हाला विश्वासात न घेता काम सुरू केले गेले, असे महंत ऋषिकेश नंदगिरी महाराज यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, सप्तश्रृंगी मंदिरातील मूर्तीला कामा दरम्यान इजा झाली असावी असा संशय त्र्यंबकेश्वर मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
एक्सपर्ट कडून अहवाल मागवूनच हे काम करावे - मंदिर प्रशासन आणि पुरातत्त्व विभागाच्या वतीने सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यातील मूर्तीचे आणि गाभाऱ्याचे जतन संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे काम करत असताना मूर्तीवर लावण्यात आलेला शेंदूर देखील काढण्यात येणार आहे. मात्र, हा शेंदूर काढत असताना मूर्तीला इजा झाली तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत नाशिकमधील सामाजिक संस्था आणि किन्नर आखाड्याच्या महतांनी या कामाला विरोध केला आहे.
मंदिर प्रशासन काय भूमिका घेणार - आजिंक्यातारा या खाजगी कंपनीला हे काम न देता भारतीय पुरातत्व विभागाच्या आणि व्हिडीओ कॅमेऱ्याच्या देखरेखी खाली काम करावे अशी मागणी करण्यात आली आहे. हे काम करत असताना देवी मूर्तीला दुखापत होऊ शकते त्या एक्सपर्टकडून अहवाल मागवूनच हे काम करावे अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे आता मंदिर प्रशासन काय भूमिका घेणार हे बघन महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - All Party Meet : संसदेचे जास्तीत जास्त कामकाज करण्यावर होणार सर्वपक्षीय बैठकीत खल