नाशिक - 8 ऑक्टोबर 1932 साली भारतीय वायू सेनेची स्थापना झाली होती. म्हणून दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस 'एअर फोर्स डे' म्हणून साजरा केला जातो. जगाच्या इतर देशातील मजबूत वायू सेनात भारतीय वायू सेनेचा समावेश होतो. युद्ध परिस्थितीमध्ये अनेक वेळा भारतीय वायू सेनेने आपलं अस्तित्वत सिद्ध करू भारताला सन्मान मिळून दिला आहे.
भारतीय सेनाचे ध्येय वाक्य -
भारतीय वायुसेनाचे ध्येय वाक्य हे भागवत गीतेच्या 11व्या अध्यायामधून घेतले आहे. जेव्हा महाभारतामध्ये युद्धावेळी कुरूक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला जो उपदेश दिला. त्या आदर्श वाक्यातील हा एक भाग आहे. युद्ध आधी जेव्हा भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला आपलं विराट रूप दाखवलं जे बघून अर्जुन काही वेळासाठी विचारात पडला होता. त्यांचे तेच रूप काही वेळासाठी अर्जुनच्या मनात भीती निर्माण करते. तेच आदर्श वाक्य आईएएफने घेतलं आहे. 'नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्ण व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम्, दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो।'
वायू सेनेचा इतिहास
एप्रिल 1933 मध्ये वायुसेनेची पहिली टीम तयार झाली. ज्यात 6 आएएफ-ट्रेंड ऑफिसर आणि 19 जवान होते, भारतीय वायु सेनाचे पाहिले कमांडर इन चीफ, एयर मार्शल सर थॉमस डब्ल्यू एल्महर्स्ट हे होते. स्वातंत्र्यानंतर सर थॉमस डब्ल्यू एल्महर्स्ट यांना भारतीय वायु सेनाचे पाहिले चीफ एयर मार्शल बनवण्यात आलं. ते 15 ऑगस्ट 1947 पासून 22 फेब्रुवारी 1950 पर्यंत या पदावर होते. एयर फोर्सला आर्मी मधून 'वेगळं करण्याचे श्रेय सर थॉमस डब्ल्यू एल्महर्स्ट यांना जाते.
वायू सेनेचा ध्वज
वायू सेनेचा ध्वज हा निळ्या रंगाचा आहे. ध्वजाच्या सुरवातीचा एकास चार भागात राष्ट्रीय ध्वज बनवला आहे. त्याच्यामध्ये तीन रंग म्हणजे केसरी, श्वेत आणि हिरव्या रंगाची गोल आकृती आहे. हा ध्वज 1951 ला बनवण्यात आला होता.
हेही वाचा - Cruise Drug Case : आर्यन खानच्या जामिनावर सुनावणी सुरु, मात्र आर्यन आर्थर रोड कारागृहाकडे रवाना