नाशिक कुणाच्याही आयुष्यात कालसर्प किंवा पितृपक्ष पूजा Importance of Kalsarp and Pitrupaksha Puja सांगितली की तो व्यक्ती अस्वस्थ होत असतो, त्यामागे अनेक कारणे असतात. गृहयोग बदलल्यास योग येतो आणि त्याच्या शांततेसाठी पुरोहित पूजा करायला सांगतात. मात्र, पितृपक्षात या पूजा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी केल्या जातात. विशेषतः बारा ज्योतिर्लिंग किंवा कुंभाच्या ठिकाणी केल्या जातात. या पूजाअर्चावरून अत्यंत वाद झाले आहेत. कारण कालसर्प दोष हा भयंकर मानला जातो. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचे पूजन व्हावे यासाठी म्हणून दरवर्षी गणेशोत्सवानंतर येणाऱ्या भाद्रपदातील पितृपक्षात कालसर्प पुजेला अधिक महत्त्व आहे. हे महत्त्व जरी पितरांसाठी असले तरीही, त्यासाठी एक धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. हिंदू धर्मामध्ये पित्तर पाटा हा साजरा केला जातो, येत्या 10 सप्टेंबरपासून पितृपक्ष Pittar Pandharwada सुरू होत आहे. pitru paksha 2022
कालसर्प हा दोष नसून तो एक योग कालसर्प हा दोष नसून तो एक योग आहे. कालसर्प योगाचा काही प्रमाणावर नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडू शकतो. ज्योतिष हे एक शास्त्र आहे. प्रत्येक माणसाची जन्मकुंडली, त्यातील ग्रहांची स्थाने यांवरून त्याचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, भविष्यातील घटनांचा एक अंदाज बांधला जातो. एका माणसाचे अनेक प्रकारे भविष्य सांगितले जाऊ शकते. जन्मकुंडली हा त्यातील एक भाग आहे. कालसर्प दोष हा खूप काही भयंकर आहे, असे मानले जाते. मात्र, तसे नाही. कालसर्प हा दोष नसून तो एक योग आहे. कालसर्पाविषयी अनेक समजुती, गैरसमजुती आहेत. कालसर्प घातकी आहे, असे मानले जाते. मात्र, तसे काहीही नाही.
योगात राहू सापाचे मुख व केतू शेपटी कुंडलीत सर्व ग्रह राहू व केतू यांच्या मध्ये येतात. तेव्हा कालसर्प योग येतो. त्यामुळे हा दोष नसून योग आहे. या योगात राहू सापाचे मुख व केतू शेपटी असतो. यामुळे भविष्यातील काही घटनांची पूर्वकल्पना मिळू शकते, असे सांगितले जाते. हा योग ज्यांच्या कुंडलीत येतो, ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम प्रकारे यश प्राप्त करू शकतात. अशा मंडळींना अचानक धनलाभ होतो; उच्चाधिकाराच्या जागा मिळतात. मात्र, उलटपक्षी हा योग तीव्र स्वरूपात असेल, तर दारिद्र्यही येते. खूप परिश्रम करून काहीही पदरात पडत नाही. आयुष्यामध्ये की पूजा कधीही करु शकतात. परंतु, लहानपणी न केल्यास, तरुणपणात कालसर्प योगाची पूजा करणे हे अतिशय चांगले आहे. जेणेकरून भविष्यात येणाऱ्या अडचणींना दूर करता येते. कालसर्प योगाला अनेक जन अशुभ मानत असतात. त्यामुळे ही पूजा करणे अतिशय महत्त्वाचे असते. देशामध्ये बद्रीनाथ, काशी आणि त्र्यंबकेश्वर, गया, गुजरात येथील चानोद या ठिकाणी कालसर्प योगाची पूजा करणे अतिशय उत्कृष्ट मानले गेले आहे. आजही त्या धार्मिक दृष्ट्या एक वेगळे महत्त्व आहे.
कालसर्प योगाचे प्रकार किती? 1)अनंत कालसर्प योग 2)कुळिक काल सर्प योग 3)वासुकी कालसर्प योग 4)पदम कालसर्प योग 5)महा पदम कालसर्प योग 6)शन्कफळ कालसर्प योग 7)तक्षक कालसर्प योग 8)कर्कोटक कालसर्प योग 9)शंखनाद कालसर्प योग 10)घातक कालसर्प योग 11)विषधर कालसर्प योग 12)शेषनाग कालसर्प योग
भाद्रपद महिन्यात केली जाते पूजा येत्या 10 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत असून, त्याची 25 सप्टेंबरला, भाद्रपद अमावस्येला समाप्ती होणार आहे. या पितृपक्षातील पूजेमुळे आयुष्यामध्ये असलेले दोष हे दूर करण्यासाठी आणि आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी, त्यांचे आशीर्वाद मिळावे यासाठी म्हणून या कालावधीमध्ये ही पूजा केली जाते. भाद्रपदाच्या पुढील पंधरवड्यात येणाऱ्या पितृपक्षामध्ये पितराची पूजा केली जाते. पितरांचा आत्मा शांत आहेच. परंतु त्यापासून आपले आणि आपल्या परिवाराचे रक्षण व्हावे, यासाठी या पूजेला खूप महत्त्व आहे. ही पूजा फक्त भाद्रपद महिन्यातील पितर पाट यातच केली जाते. इतर वेळेस ही पूजा केली जात नाही. ज्यावेळी एखाद्या व्यक्ती चे निधन होते, त्यावेळी पूजेसाठी आलेले ब्राह्मण हे पितरांची म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या शांतीसाठी एक पूजा करतात. या पूजेचा भात आणि काळे तीळ वापरले जातात. जव म्हणजे गव्हातील एक प्रकार असतो, ते जव वापरतात. pitru paksha 2022
हेही वाचा Jyeshtha Gauri Pujan : साताऱ्यात पवार कुटुंबीयांनी साकारले गौराईसमोर 'अष्टविनायक देखावा'