ETV Bharat / city

Pitru Paksha 2022: काकस्पर्श महत्व फक्त दशक्रिया विधीला, पितृपक्षात नाही - पुजारी सतीश शुक्ल - Dasakriya Ritual Not For Pitrupaksha

10 सप्टेंबर 2022 पासून पितृपक्षास ( Pitru Paksha 2022 ) सुरवात होत असून या पंधरवड्यात ज्यांचा स्वर्गवास झाला आहे ते पूर्वज वायू रुपात पृथ्वीवर येतात. या दरम्यान ते त्यांच्या वंशजांकडे अन्न आणि जल याची अपेक्षा करत असतात, तेव्हा अनेकबजण पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधि करतात. या श्राद्ध विधी मध्ये कावळ्याने घास घेतलाच पाहिजे अस नसून काकस्पर्षचे महत्व ( Importance Of Kakasparsha ) हे फक्त दशक्रिया विधीला असून पितृपक्षात नाही. असे पुजारी सतीश शुक्ल ( Priest Satish Shukla ) यांनी म्हटले आहे.

Pitru Paksha 2022
पितृ पक्ष 2022
author img

By

Published : Sep 10, 2022, 4:06 PM IST

नाशिक - 10 सप्टेंबर 2022 पासून पितृपक्षास ( Pitru Paksha 2022 ) सुरवात होत असून या पंधरवड्यात ज्यांचा स्वर्गवास झाला आहे ते पूर्वज वायू रुपात पृथ्वीवर येतात. या दरम्यान ते त्यांच्या वंशजांकडे अन्न आणि जल याची अपेक्षा करत असतात, तेव्हा अनेकबजण पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधि करतात.ज्यात कुत्रा, गाय आणि कावळा यांना विविध खाद्यपदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. मात्र या श्राद्ध विधी मध्ये कावळ्याने घास घेतलाच पाहिजे अस नसून काकस्पर्षचे महत्व ( Importance Of Kakasparsha ) हे फक्त दशक्रिया विधीला असून पितृपक्षात नाही. ( Dasakriya Ritual Not For Pitrupaksha ) असे पुजारी सतीश शुक्ल यांनी म्हटले आहे.

जीवनात तीन ऋण - पितृ श्राद्धामध्ये कावळ्याला घास ठेवायचा असतो कावळा घास घेईपर्यंत थांबायचे नसते. कावळ्याने घास घेतलाच पाहिजे याचा आग्रह करायला नको, कारण फक्त दशक्रिया विधीमध्येच काकस्पर्शाचे महत्त्व आहे. दशक्रिया विधी मध्ये काकस्पर्श झाल्यानंतर पुढील कार्य करता येते. हिंदू धर्मात मनुष्य जन्माला आला की त्याच्यावर तीन ऋण असतात त्यात देव ऋण, पितृ ऋण, समाज ऋण याचे सर्वानी पालन केले पाहिजे. म्हणजे त्यांचे आयुष्य सार्थक होते असे शुक्ल पुजारी सांगतात.

काकस्पर्षचे महत्व फक्त दशक्रिया विधीला, पितृपक्षात नाही - पुजारी सतीश शुक्ल

दशक्रिया विधीत कावळ्याचे महत्व ( Importance Of Crow In Pitru Paksha ) - हिंदू चालीरीतींनुसार व्यक्तीच्या निधनानंतर अस्थीसंचय करण्यापासून ते दहा दिवसापर्यंत विविध धार्मिक विधी केल्या जातात. त्यामध्ये एकपिंडदान, मृत्तिकास्नान, विषमश्राद्ध, वपन, पाच मडक्यांवर पोळ्या, छत्र, पादुका, कावळा शिवणे अशा विविध विधींचा समावेश होतो. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मृत्युनंतर दहा दिवस मृत व्यक्तीचा आत्मा पृथ्वी तलावर वास करतो. दहावा विधी केल्यानंतर त्याच्या इच्छा तृप्त न झाल्यास त्याला मुक्ती मिळत नाही. इच्छा राहिल्या नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडाला कावळा शिवल्यास मुक्ती मिळते. कारण कावळ्याच्या रूपात आत्मा असतो अशी धारणा आहे. परंतु कधीकधी कावळा शिवत नाही अशा वेळेस बर दर्भाचा कावळा स्पर्श पिंडाला करून कावळा शिवला असे मानतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.