ETV Bharat / city

नाशिक जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरवात

author img

By

Published : May 17, 2021, 12:38 PM IST

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बऱ्याच भागांमध्ये दिसून आला आहे. तरीही जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

नाशिक - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बऱ्याच भागांमध्ये दिसून आला आहे. शहरातील बहुतेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या, अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळून पडल्या तर, रस्त्यावर काही होर्डिंग देखील पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी नाकेबंदीसाठी रस्त्यावर उभारलेले कापडी मंडप देखील उडुन गेले आहेत.

नाशिक जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरवात

पुढील दोन ते तीन दिवस पावसाच्या सरी कोसळण्याचा हवामान खात्याचा अंदाज

नाशिक शहर परिसरात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. रविवारी दुपारपासूनच अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. शहरात दुपारनंतर उन-सावलीचा खेळ सुरु होता. शहरातील पंचवटी, सिडको, पाथर्डी, उपनगर या भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. मात्र उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वादळामुळे सातपूर, गंगापूर रोड, सिडको परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. तसेच जिल्ह्यातील सटाणा, मनमाड, मालेगाव या तालुक्यातील काही भागात तुरळक पाऊस झाला. पुढील दोन ते तीन दिवस नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सतर्क राहण्याचा सूचना

नाशिक जिल्ह्याला चक्रीवादळाचा फटका बसणार नसल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. तरीही जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तर जिल्हा नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातून घेतला तौक्ते वादळाचा आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.