ETV Bharat / city

नाशिकमध्ये सेना-भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय वर्चस्वातून टोळीयुद्ध - नाशिक राजकारण बातमी

नाशिक शहरात भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. भाजप नेते सतीश सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिकार्याचा बॅनर फाडल्यानंतर त्यांच्या कार्यालयावर आज (दि. 5 मे) एका टोळक्याने सिनेस्टाईल हल्ला चढवला आहे. या हल्ल्याने नवीन नाशिक भागात तणाव निर्माण झाला आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : May 5, 2021, 3:53 PM IST

Updated : May 5, 2021, 4:54 PM IST

नाशिक - शहरात भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. भाजप नेते सतीश सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिकार्याचा बॅनर फाडल्यानंतर त्यांच्या कार्यालयावर आज (दि. 5 मे) एका टोळक्याने सिनेस्टाईल हल्ला चढवला आहे. या हल्ल्याने नवीन नाशिक भागात तणाव निर्माण झाला आहे.

बोलताना भाजप पदाधिकारी व पोलीस अधिकारी

हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात देखील कैद

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय वर्चस्वातून सुरू झालेला वाद टोळी युद्धावर जाऊन पोहोचला आहे. भाजप नगरसेवक तथा पालिकेचे सभागृह नेते सतीश सोनवणे यांच्या कार्यालयाची आणि वाहनांची आज दुपारच्या सुमारास एका अज्ञात टोळक्याने सिनेस्टाईल पद्धतीने हल्ला करत तोडफोड केली आहे. या हल्ल्यात सतीश सोनवणे यांच्या शासकीय वाहनांसह कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. हा सर्व हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

दरम्यान, या हल्ल्यानंतर सतीश सोनवणे यांच्या समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. तर घटनेची माहिती मिळताच नाशिक शहर भाजपाच्या पदाधिकांऱ्यासह महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात धाव घेत संशयितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या मांडला. महाविकास आघाडीच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दरम्यान, ही तोडफोड शिवसेना पदाधिकरी सागर देशमुख आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचा आरोप सतीश सोनवणे यांनी केला आहे. तर भाजप नेते गणेश गीते यांनी या प्रकरणाचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

शिवसेनेच्या बँनरची दोन दिवसापूर्वी केली होती तोडफोड

दरम्यान, सागर देशमुख यानी कार्यलयावर हल्ला केल्याचा आरोप सतीश सोनवणे यानी केला आहे. सागर देशमुख हा शिवसेना पदाधिकारी असून देशमुख यांच्या राजीव नगर येथील बॅनरची गेल्या दोन दिवसांपूर्वी सतीश सोनवणे यानी त्यांच्या कार्यकर्तांनी मोडतोड केल्याची घटना घडली होती. या दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच सीसीटीव्हीच फुटेज देखीलही आले आहे.

संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल - पोलीस

भाजप नेते सतीश सोनवणे यांनी शिवसेना पदाधिकारी सागर देशमुख यांच्या बॅनरची दोन दिवसांपूर्वी मोडतोड केल्याचा राग मनात धरून आज भर दुपारी सागर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर हा हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज च्या आधारावर संशयितांविरोधात गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे.

...तर घटना टळली असती

नवीन नाशिक परिसरात राजकीय वर्चस्वातून दोन मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने शहरातील राजकीय टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, पोलिसांना दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची माहिती असताना देखील पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याने आजची ही हल्ल्याची घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पोलिसांनी वेळीच या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत समज दिली असती तर आज ही हल्ल्याची घटना घडली नसती, असाही आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे शहरात जमावबंदी आणि लॉकडाउनच्या नियमांची अंमलबजावणी सुरू असताना शहरातील भरवस्तीत टोळक्याकडून हल्ला केला जात असल्याने या हल्ल्याच्या घटनेने पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी वेळीच कठोर कारवाई केली नाही तर भविष्यात शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो.

हेही वाचा - नाशिकमध्ये कोरोनाने आईचा मृत्यू; सॅनिटायझर पिऊन मुलीची आत्महत्या

Last Updated : May 5, 2021, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.