नाशिक - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील शासकीय कन्या आश्रम शाळेत शिक्षकाने मासिक पाळी असल्याने एका विद्यार्थिनीला झाड लावण्यास मजाव केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत ईटीव्ही भारतने विद्यार्थिनीची कैफियत मांडली होती. यावर आज अदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी शिक्षकांची समिती नेमून या प्रकरणा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेत कोणी शिक्षक दोषी आढळल्यास त्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहेत.
काय होते प्रकरण - एकीकडे भारत देश आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धा बघायला मिळत आहे. अशीच एक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील शासकीय कन्या आश्रम शाळेत घडली. शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान शिक्षक आर.टी. देवरे यांनी अजब फतवा काढत, ज्या मुलींना मासिक पाळी आहेत. त्यांनी झाड लावू नये. मागच्या वेळेस झाडे जगली नाही, असे म्हणत त्यांनी अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला झाड लावण्यास मज्जाव केला. शिक्षकाच्या या वर्तणुकीमुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते.
ग्रामीण भागात अजून आहे अंधश्रद्धा - ग्रामीण भागात आजही अनेक अंधश्रद्धाचे प्रकार बघायला मिळतात,जादू टोना ,पैशाचा पाऊस,दरवाजाला लिंबू मिरची लावणे,साप मारल्यावर त्याचे तोंड ठेचने, रात्री नख न कापणे, इच्छापूर्ती साठीनदीत पैसे टाकणे, स्मशान भुमीतून आल्यावर आंघोळ करणे यासारख्या अनेक अंधश्रद्धा आजही ग्रामीण भागात बघायला मिळतात.
परीक्षेला बसू देणार नाही - मागच्या वर्षी आपण शाळेत वृक्षारोपण केले होते, मात्र ती झाडे जगली नाही, आता आपण पुन्हा वृक्षारोपण करत आहोत, मात्र यंदा ज्या मुलींना मासिक पाळी आहे त्यांनी वृक्षारोपण करू नये, असे म्हणत त्यांनी मला झाड लावू दिले नाही. याबाबत मी त्यांना विचारले तर तू जास्त बोलते असे म्हणत 12 वीच्या परीक्षेत तुला कमी मार्क देऊन मला धमकावले. आश्रम शाळेत अनेक समस्या आहेत. नाष्टा व जेवण चांगले मिळत नाही. शाळेत विद्यार्थ्यांकडून साफसफाई करण्याचे काम करून घेतात. अंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही, अशा अनेक अडचणींना आम्हा मुलींना सामोरे जावे लागत आहे असे विद्यार्थ्यांनीने सांगितले.
हेही वाचा - अंधश्रद्धेचा कळस! मासिक पाळी असल्याने विद्यार्थिनीला झाड लावण्यास मजाव