ETV Bharat / city

सामूहिक बलात्कार प्रकरण; आरोपींना न्यायालयाने ठोठावली ३ दिवसाची पोलीस कोठडी

रविवारी रात्री महिलेला रिक्षातून पळवून नेत विविध ठिकाणी दोघांना सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

author img

By

Published : Apr 3, 2019, 12:00 PM IST

घटनास्थळ

नाशिक - पंचवटीतील २२ वर्षीय पीडितेवर दोघांनी रविवारी रात्री रिक्षातून पळवून नेत विविध ठिकाणी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. बाळा उर्फ कल्याण नारायण तायडे व काळ्या उर्फ दिगंबर विठोबा कुंदे असे त्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

पेठ रोड परिसरातील एका बावीस वर्षीय महिलेला बाळा उर्फ कल्याण नारायण तायडे ( वय २२ रा. हनुमान नगर पंचवटी ) आणि काळ्या उर्फ दिगंबर विठोबा कुंदे ( वय १९ रा. अश्वमेध नगर पंचवटी ) या संशयित नराधमांनी रविवारी रात्री रिक्षातून पळवून नेले. या दोघांनी पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डच्या एका गाळ्याच्या गच्चीवर आणि इरिगेशन कॉलनी परिसरात सामूहिक अत्याचार केला. यानंतर पीडितेला रिक्षात बसून सोमवारी पहाटे पाच वाजेताच्या सुमारास तिच्या घराच्या परिसरात रिक्षाने सोडून देत पलायन केले.

याप्रकरणी पीडितने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेने सांगितलेल्या वर्णनावरुन पंचवटी पोलिसांनी संशयितांची शोध मोहीम सुरू करीत यातील मुख्य आरोपी बाळा उर्फ कल्याण नारायण तायडे याला ओझर जवळील दीक्षी येथून तर त्यातील दुसरा आरोपी काळ्या उर्फ दिगंबर विठोबा कुंदे याला पंचवटी परिसरातून ताब्यात घेतले. दरम्यान या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या ( एम. एच. १५ एफ यू ३२ ७४ ) या क्रमांकाची रिक्षाही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही.मोरे करीत आहेत. दरम्यान या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली असून सदर महिलेची तक्रार नोंदून घेण्यात कुठलाही विलंब झाला नाही. महिलेच्या तक्रारीवरुन तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. पाटील यांनी दिली.

Intro:पंचवटीतील एका 22 वर्षीय पीडीतेवर दोघांना रविवारी रात्रीच्या सुमारास जबरदस्तीने रिक्षातून पळवून नेत विविध ठिकाणी पाशवी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती यातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

Body:याप्रकरणी आम्ही दोन संशयितांना अटक केली असून सदर महिलेची तक्रार नोंदून घेण्यात कुठलाही विलंब झाला नसून महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक के डी पाटील यांनी दिली

Conclusion:पेठ रोडवरील कर्णनगर परिसरात राहणाऱ्या एका बावीस वर्षीय महिलेला दोन संशयित नराधमांनी रविवारी रात्रीच्या सुमारास जबरदस्तीने रिक्षातून पळवून नेले या दोघांनी पेठ रोडवरील शरद चंद्र पवार मार्केट यार्ड च्या एका गाळ्याच्या गच्चीवर आणि इरिकेशन कॉलनी परिसरात सामूहिक अत्याचार केला यानंतर पीडितेला रिक्षात बसून सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास तिच्या घराच्या परिसरात रिक्षाने सोडून देत पलायन केले या प्रकरणी पीडित महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पीडित महिलेच्या सांगितलेल्या वर्णनावरून पंचवटी पोलिसांनी संशयितांची शोध मोहीम सुरू करीत यातील मुख्य आरोपी बाळा उर्फ कल्याण नारायण तायडे वय 22 रा. हनुमान नगर पंचवटी याला ओझर जवळील दीक्षि येथून तर त्यातील दुसरा आरोपी दिगंबर उर्फ काळ्या विठोबा कुंदे वय 19 रा. अश्वमेध नगर पंचवटी परिसरातून ताब्यात घेतले दरम्यान या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या एम एच 15 एफ यू 32 34 या क्रमांकाची रिक्षाहि पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही.मोरे करीत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.