ETV Bharat / city

गृहमंत्र्यांना 100 कोटी, मग वर्षा बंगल्यावर किती? किरीट सोमैय्यांचा सवाल - Kirit Somaiya om uddhav thackeray

भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे.

Kirit Somaiya
भाजप नेते किरीट सोमैय्या
author img

By

Published : Mar 22, 2021, 6:01 PM IST

Updated : Mar 22, 2021, 6:12 PM IST

नाशिक - सचिन वाझे जर गृहमंत्र्यांना 100 कोटी देतो तर, मग वर्षा बंगल्यावर किती? असं म्हणत किरीट सोमैय्या यांनी थेट मुख्यमंत्री यांच्यावर आरोप केला आहे. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोमैय्या बोलतं होते.

भाजप नेते किरीट सोमैय्या

हेही वाचा - देशमुखांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही; तपासाची दिशा बदलण्यासाठीच आरोप - पवार

भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात परमबीर चांगले अधिकारी आहेत आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री म्हणतात परमबीर सिंग लबाड माणूस आहे. शरद पावर हे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करत असून, पवार यांनी देशाची चेष्टा करणं थांबवावे, असं सोमैय्या यांनी म्हटलं आहे. परमबीर सिंग करत असलेले आरोप खोटे असेल तर त्यांना गृहमंत्री हाकलून का लावत नाहीत, असा सवाल सोमैय्या यांनी उपस्थित केला. गृहखातं हे अनिल परब चालवतात, असं ही सोमैय्या यांनी म्हटलं आहे.

एटीएस तपास करणं म्हणजे सरकारचा केविलवाणा प्रयत्न

शरद पवार म्हणतात परमबीर सिंग यांच्या पत्रावर सही नाही, मग गृहमंत्री अनिल देशमुख पत्राला उत्तर का देतात? एनआयए सचिन वाझेचा तपास करत असताना पॅरलल एटीएस तपास करते म्हणजे हा सरकारचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे किरीट सोमैय्या यांनी म्हटलं आहे. अनेक गाड्या वाझेकडे होत्या, त्यांचा वापर कोण करत होते हे परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारा त्यांना माहीत होते, असं किरीट सोमैय्या यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - LIVE : लोकसभा कामकाजाचे प्रक्षेपण

राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर.

कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रात गंभीर आहे. देशात कोरोना सर्वात वाढणारे राज्य महाराष्ट्र आहे. गेल्या 10 दिवसात सर्वधिक रुग्ण राज्यात वाढले असून, याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. लसीकरणवरून सरकार राजकारण करत आहे. लसीकरणसाठी केंद्राने 72 लाख लस दिल्या आहेत. मात्र लसीकरण झालं 40 लाख मग तुटवडा कसा? असा प्रश्न सोमैय्या यांनी उपस्थित केला. दुसरीकडे पैसे मंजूर होऊनही जिल्हा रुग्णालयात लिक्वीड ऑक्सिजन प्लॅन्ट तयार होत नाही, याबाबत देखील किरीट सोमैय्या यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा - शरद पवारांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न - सुधीर मुनगंटीवार

Last Updated : Mar 22, 2021, 6:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.