ETV Bharat / city

काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद, तर राष्ट्रवादी हे काँग्रेसचे पिल्लू - पंकजा मुंडे

काँग्रेसांनी ब्रिटिशांप्रमाणे देशात 'डिव्हाईड अॅन्ड रूल' (फोडा आणि राज्य करा) पॉलिसी राबवली. काँग्रेसने देशात सत्तेच्या माध्यमातून व्यवहार केला.

पंकजा मुंडे
author img

By

Published : Apr 11, 2019, 1:08 PM IST

नांदेड - काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसचे पिल्लु आहे, अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी केली. भाजपचे नांदेडचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे मुखेड येथे आल्या होत्या.

पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

मुखेड येथील जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. काँग्रेसांनी ब्रिटिशांप्रमाणे देशात 'डिव्हाईड अॅन्ड रूल' (फोडा आणि राज्य करा) पॉलिसी राबवली. काँग्रेसने देशात सत्तेच्या माध्यमातून व्यवहार केला. त्यामुळे देशातील जनतेचा काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे. पहिल्यांदा त्यांना पर्यायच नव्हता. आमचेच राज्य जन्मभर टिकणार आहे, अशाप्रकारे त्यांनी राज्य करायला सुरुवात केली.

भाजप जेंव्हा सक्षम पक्ष म्हणून उभा राहिला तेंव्हा काँग्रेसने डिव्हाईड अॅन्ड रूल पॉलिसी वापरली. भाजप अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे, असा प्रचार करत देशामधी उभी फळी करण्याचा प्रयत्न केला. जाती आणि धर्मावरुन आमच्यावर आरोप करणाऱ्यांनो तुम्हीच जाती आणि धर्माचे राजकारण केले, असा आरोप पंकजा मुंडेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केला.

Intro:
नांदेड : कॉंग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद पंकजा मुंडे

नांदेड : कॉंग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेस हे कॉंग्रेसचे पिल्लु आहे अशी घणाघाती टिका पंकजा मुंडे यांनी केली... नांदेड चे भाजपाचे ऊमेदवार प्रताप पाटिल चिखलीकर यांच्याप्रचारासाठी पंकजा मुंडे मुखेड येथे आल्या होत्या.Body:
मुखेड येथील जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस आणि राष्टृवादीवर जोरदार हल्लाबोल केला... कॉंग्रेसवाले म्हणजे ब्रिटेशांची औलाद आहे.Conclusion:
यांनी ब्रिटेशांप्रमाणे देशात दिव्हाईड अ‍ॅंड रूल पॉलीसी राबवली अशी टिका पंकजा यांनी केली... राष्ट्रवादी कॉंग्रेस हे याच कॉंग्रेसचे पिल्लु आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.