ETV Bharat / city

विदर्भवाद्यांनी सरकार मेले म्हणत केले मुंडन; पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांना वाहिली श्रद्धांजली

वेगळ्या विदर्भाची मागणी करूनही लक्ष न देणाऱ्या मोदी आणि राज्य सरकार मेले म्हणत विदर्भ आंदोलन समितीने निषेधार्थ शोक व्यक्त केला. सरकारच्या निषेधार्थ युवा आघाडीने मुंडन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. नागपुरच्या इतवारी परिसरातील चंडिका मंदिरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या फलकला हार घालून श्रद्धांजली वाहिली.

विदर्भवाद्यांनी सरकार मेले म्हणत केले मुंडन

author img

By

Published : Aug 11, 2021, 7:20 PM IST

नागपूर - वेगळ्या विदर्भाची मागणी करूनही लक्ष न देणाऱ्या मोदी आणि राज्य सरकार मेले म्हणत विदर्भ आंदोलन समितीने निषेधार्थ शोक व्यक्त केला. सरकारच्या निषेधार्थ युवा आघाडीने मुंडन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. नागपुरच्या इतवारी परिसरातील चंडिका मंदिरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या फलकला हार घालून श्रद्धांजली वाहिली. तसेच सरकार आणि मंत्री मेले आहे, असे म्हणत शोक व्यक्त करण्यात आला आहे.

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांना वाहिली श्रद्धांजली

सरकार मेले म्हणत व्यक्त केला शोक -

इतवारी परिसरातील चंडिका मंदिरात मागील तीन दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यात दुसऱ्या दिवशी पोलिसांनी परवानगी नाकारत आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलन दडपण्याच्या प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी पोलिसांनी सोडून दिल्यानंतर आपल्या भूमिकेवर ठाम राहत त्यांनी पुन्हा आंदोलनस्थळी आपले आंदोलन सुरू केले. आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी सरकार वारंवार मागणी करूनही वेगळा विदर्भ देण्यासाठी पाऊले उचलत नाही आहे. यामुळे आमच्यासाठी मोदी सरकार मेले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वीज पंपाची माफी आणि कोरोनाकाळात 200 युनिट सर्वसामान्य नागरिकांची वीज माफी असो यासह केंद्रासोबत राज्यात पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ झाली असून आपले कर कमी करून लोकांना दिलासा द्यावा, ही मागणी केली होती. या मागण्यांना मान्य करण्याऐवजी पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा काम करत असलयाने राज्य सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत हे आमच्यासाठी मेले आहे, अशी भावना व्यक्त करत निषेध करण्यात आला.

सरकार मेले म्हणत केले मुंडन
सरकार मेले म्हणत केले मुंडन

युवा आघाडीच्या 9 जणांनी केले मुंडन आंदोलन -

यावेळी युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मसुरकर यांच्यासह एकूण 9 जणांनी हे स्वतःचे केस देऊन मुंडन करून घेतले. यावेळी विजय मोहत्येकर यांनी विदर्भ वेगळा झाल्याशिवाय केस कापणार नाही, असा निर्धार केला. शिवाय महिला आघाडीच्या सुनीता येणें यांच्यासह काही महिलांनी केस देऊन आंदोलन केले.

सरकार मेले म्हणत केले मुंडन
सरकार मेले म्हणत केले मुंडन

आता अन्याय सहन करणार नाही -

राज्य सरकार, केंद्र सरकार दोन्ही विदर्भावाद्यांच्या मागण्यांकडे गांभीऱ्याने घेत नसल्याने आमच्यासाठी ते मेले आहेत. आता मयतीला चला असा नारा देत आम्ही श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र यापुढे आम्ही शेतकरी आत्महत्या, सिंचनाचा अनुशेष, कुपोषण, नक्षलवाद हे सहन करणार नाही असा इशारा देत विदर्भ वेगळा झाला पाहिजे यासाठी हा लढा शेवटपर्यंत असाच सुरू राहील असेही विदर्भ राज्य समितीचे अध्यक्ष वामन चटप यांनी यावेळी बोलून दाखवले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.