ETV Bharat / city

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते बुटीबोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण - नागपूर बुटीबोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण

आज नागपूर-हैदराबाद महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी येत्या सहा महिन्यात नागपूर ते बुटीबोरी असा सहा पदरी रस्ता आणि मेट्रोच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करणार असल्याची घोषणा केली.

Nitin Gadkari inaugurates Butibori flyover
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते बुटीबोरी उड्डाण पुलाचे लोकार्पण
author img

By

Published : Jun 17, 2021, 8:53 PM IST

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आज नागपूर-हैदराबाद महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी येत्या सहा महिन्यात नागपूर ते बुटीबोरी असा सहा पदरी रस्ता आणि मेट्रोच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करणार असल्याची घोषणा केली. एवढेच नाही, तर बुटीबोरी नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केला.

प्रतिक्रिया

'या उड्डाण पुलाचे काम उत्तम आणि कमी कालावधीत पूर्ण' -

नागपूरला वर्धा, चंद्रपूर, हैदराबाद या शहरांना जोडणाऱ्या या पुलाचे बांधकाम तत्काळ गरजेचे होते. मात्र, यासंदर्भातील वाद न्यायालयात असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा उड्डाणपुल रखडला होता. ज्यामुळे अपघाताची संख्या वाढली होती. मात्र, न्यायालयातून हे प्रकरण निकाली निघताच या ठिकाणी भव्य उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली. तसेच इतर उड्डाणपुलांच्या तुलनेत या पुलाचे काम उत्तम आणि कमी कालावधीत झाल्याचे नितीन गडकरींनी सांगितले.

नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णय -

बुटीबोरी ही राज्यातील आदर्श नगर परिषद बनावी, या दृष्टीने एक विकास आराखडा तयार केला जावा, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. बुटीबोरीत चांगली शाळा महाविद्यालये, लोकांसाठी चांगला बाजार, परवडणारी घरे तयार करून एक आदर्श टाऊनशिप म्हणून या शहराचा विकास व्हावा, यासाठी पाठपुरावा करून विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याकरिता बुटीबोरी नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केला. यापूर्वी गाव दत्तक घेण्याची योजना होती. मात्र, एखाद्या नेत्याने नगर परिषद दत्तक घेण्याची ही पहिलीच घटना आहे.

हेही वाचा - ऐतिहासिक WTC FINAL साठी टीम इंडियाचा ११ जणांचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.