ETV Bharat / city

YOUTHS DROWN IN AMBAZARI LAKE : अंबाझरी तलावात बुडल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू - अंबाझरी तलाव नागपूर

नागपूरच्या अंबाझरी तलावात ( Ambazari Lake Nagpur ) दोन तरुणांचा बुडल्याने मृत्यू ( Two youths drowned) झाल्याची दुर्दैवी घडली आहे. आज दुपारच्या सुमारास चार मित्र फिरण्याच्या उद्देशाने अंबाझरी तलाव परिसरात आले होते. यावेळी चारही तरुणांना तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोन तरुण तलावाच्या पाण्यात बुडाले आहेत.

Two Youths Drown In Ambazari Lake
Two Youths Drown In Ambazari Lake
author img

By

Published : Jul 3, 2022, 10:28 PM IST

नागपूर - फिरायला गेलेल्या तरुणांना पोहण्याचा मोह होऊन अंबाझरी तलावात ( Ambazari Lake Nagpur ) दोघे बुडाल्याची घटना ( Two youths drowned) आज घडली. या घटनेची माहिती समजताच अंबाझरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने दोन्ही तरुणांचे मृतदेह शोधले आहेत. मिहीर शरद उके (२०) आणि चंद्रशेखर किशोर वाघमारे (२०) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

सुट्टीचा आनंद घेणे बेतले जीवावर - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिहीर, चंद्रशेखर वाघमारे, प्रशिक भिडे आणि अक्षय हे चार तरुण दुपारच्या सुमारास अंबाझरी तलाव परिसरात फिरायल गेले होते. सकाळपासूनच शहरात रिमझिम पाऊस सुरू असल्याने त्यांनी हा बेत आखला होता. त्यांना पोहण्याचा मोह झाला आणि ते तलावात उतरले. मात्र, उत्साहाच्या भरात दोघांना तलावाच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला.

हेही वाचा - Devendra Fadnavis : 'उमेश कोल्हे हत्या प्रकरणात विदेशी हात आहे का?, याची चौकशी होणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.