नागपूर: चोर आला मंदिरात चोरी केली आणि मग काय चोराने केलेल्या पराक्रमाची सर्वत्र चर्चाचं सुरू झाली. मात्र, हे सर्व घडत असताना त्या चोराचे हृदय परिवर्तन झाले आणि चोराने मंदिरातून चोरलेला सर्व ऐवज चक्क मंदिरात परत दिला. यामध्ये हनुमानाची चांदीचा गदा देखील आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या Kanhan Police Station हद्दीतील हनुमान मंदिरात घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हनुमानाची चांदीची गदा चोरल्यानंतर मला हनुमानाचा साक्षात्कार झाल्याचे सांगत ही गदा परत दिल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.
मंदिरात घटना चार दिवसांपूर्वी कन्हान येथील पांदण रोड परिसरातील हनुमान मंदिरात घडली होती. रात्रीच्या आधाराचा गैरफायदा घेत आरोपी संदीप लक्षणे याने हनुमान मूर्ती जवळची गदा चोरी केले होती. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद incident caught on CCTV झाला होता. त्याआधारे कन्हान पोलिसांनी तपास सुरू केला होता.
हुनुमानाचा साक्षात्कार झाला सीसीटीव्हीचे आधारे चोरट्याचा शोध सुरू होता, पण चोरीच्या दोन दिवसानंतर आरोपी संदीप लक्षणे मंदिरात आला. त्याने चोरलेली हनुमान मूर्तीजवळची चांदीची गदा आणून ठेवली. याबाबत पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आरोपी संदीप लक्षणे याची चौकशी केली असता त्याने हनुमानाचा साक्षात्कार झाल्यामुळे चांदीची गदा आणि अगरबत्तीचे पात्र परत आणून दिल्याचे सांगितले आहे.
हनुमानाची माफी मागून केली चोरी आरोपी संदीप याने हनुमान मंदिरात चोरी करताना आधी हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार केला. चोरीच्या गुन्ह्यासाठी माफी देखील मागितली आहे. त्यानंतर त्याने हनुमानाची गदा लंपास केली होती.