नागपूर - गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उकाडा आणि गर्मीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, हा तपास नागरिकांनाच नाहीतर चोरट्यांनाही होताना दिसून येत आहे. कारण नागुपूरमध्ये ( Nagpur ) चोरट्यांनी चक्क आईस्क्रिमच्याच ( Ice Cream) दुकानावर डल्ला मारला. नागपूर शहरातील धंतोली पोलीस स्टेशन अंतर्गत दोन आइस्क्रीम पार्लरवर चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारत आणि आइस्क्रीम घेऊन पसार झाले आहे. मात्र ही आइस्क्रीम चोरट्यांनी खाण्यासाठी नेली की विकली याबद्दलचा शोध पोलीस घेत आहेत.
नागपूर शहरातील खमला परिसरात दादाजी शिंदे यांच्या आइस्क्रीम पार्लरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. या दुकानातून जवळपास पंधरा हजार रुपयांचे आईस्क्रीम चोरट्यांनी लांबविले. त्यानंतर सावरकरनगर मधील रमेश खवले यांच्याही डेअरीची कुलूप तोडून दोन हजारांचे आईस्क्रिम चोरून नेले. एकाच रात्री दोन आईस्क्रिम पार्लवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांना चोरट्यांनी नेलेले आईस्क्रिम शोधण्यात यश येईल की त्याआधीच आईस्क्रिम वितळून जाईन हे पाहणे अशी खमंग चर्चा नागपूरकर करीत आहेत.
100 किलो आईस्क्रिम वर मारला डल्ला - या घटनेचे सीसीटीव्हीत फुटेज मिळाले आहे. सावरकर नगरातील डेअरीमध्ये चोरटे कुलूप तोडून शिरले. यावेळी त्यांनी याच दुकानात चॉकलेट शेख आणि इलायची दोन दोन अश्या चार रिकाम्या बॉटल मिळून आल्याने त्यांनी ते बादाम शेक पिले असावे असेही रमेश खवले सांगतात. त्यानंतर त्यांनी दुकानातील चार आईस्क्रिमचे फॅमिली पॅकचे डब्बे, त्यात चॉकलेट आईस्क्रिम, कुकीक्रम, मँगो, शाही मेवा मलाईचे डब्बे चोरून नेल्याचे सांगितले असा एकूण 1200 ते 1300 रुपयाचे आईस्क्रिम आणि काही रोखही चोरून नेलेत. यासोबतच नरेंद्र नगर भागातील दादा शिंदे यांच्या दुकानातुन कुलूप कापून चोरट्यानी आतमध्ये प्रवेश केला. त्यात त्यानी सुमारे 15 हजाराचे आईस्क्रिम म्हणजे सुमारे 100 किलोपेक्षा जास्त आईस्क्रिम चोरट्यानी चोरून नेले आहे.
लग्नासाठी 2 हजार पाहुण्यांना पुरेल इतके आईस्क्रिम चोरीला - साधारण एक हजार लोकांनी दोन वेळा जरी आईस्क्रिम खाल्ली तरी सुमारे 75 किलो आईस्क्रिम लागते. त्यानुसार या चोरट्यानी जवळपास 115 ते 120 किलो आईस्क्रिम चोरून नेली. त्यामुळे जर का एकदा आईस्क्रिम खालली तर असा अंदाज आहे की किमान 2 हजार लोकांना पुरेल इतकी आईस्क्रिम चोरट्यानी लांबवली आहे. त्यामुळे एका लग्नाला पुरेल इतक्या आईस्क्रिमचे चोरट्यांनी नेमके काय केले असावे याचाही शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे. या संदर्भात धंतोली पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सावित्री ढगे यांना विचारणा केली तेव्हा चोरट्यांचा शोध घेत आहे. पण यात चोरट्याचा आईस्क्रीम चोरीचा उद्देश काय हे अद्याप कळू शकले नाही अशी माहिती त्यांनी दिली.