ETV Bharat / city

Nagpur Municipal Corporation : मनपाच्या साहित्य खरेदी घोटाळ्याच्या चौकशीचा समितीचा सूर जुळे ना! - स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर

महापालिकेत (Nagpur corporation) स्टेशनरी घोटाळ्याचा ( stationery scam) वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजून काही घोटाळे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपन्या एकाच कुटुंबातील आहेत आणि त्या वेगवेळ्या व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

nagpur
नागपूर महापालिका
author img

By

Published : Dec 31, 2021, 10:25 AM IST

Updated : Dec 31, 2021, 11:45 AM IST

नागपूर : महापालिकेत घडलेल्या स्टेशनरी घोटाळ्याचा (Nagpur Municipal Corporation stationery scam ) तपास कोणी करावा यावरून आता लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनात जुंपण्याची शक्यता वर्तवली आहे. नागपूर मनपा आयुक्तांनी प्रशासनाकडून चौकशी समिती नेमून चौकशीच्या कामाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजप पक्ष आणि विरोधीपक्ष काँग्रेसकडूनही प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीवर आक्षेप घेतला आहे. तर मग एखाद्या निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर ( Standing Committee Chairman Prakash Bhoyar ) यांनी केली आहे.

नागपूर महापालिका
काँग्रेसची भूमिका राज्यसरकाराच्या समितीने चौकशी करावी...ज्यांनी घोटाळा केला तेच त्याची चौकशी कशी करू शकतील असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे महापालिकेतील स्टेशनरी आणि इतर घोटाळे किमान शंभर कोटींच्या घरात असल्याचा आरोप नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे ( Congress MLA Vikas Thackeray ) यांनी केला आहे. यासोबतच घोटाळ्याचा तपास महाविकास आघाडी सरकारकडून ( Mahavikas Aghadi government ) नेमलेल्या समितीमार्फत करण्याची मागणी केली आहे. हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात स्टेशनरी घोटाळ्याचा मुद्दा उचलला असल्याचेही आमदार ठाकरे यांनी सांगितले.बोगस हस्ताक्षरावरून घोटाळा समोर आला -नागपूर महापालिकेतील आरोग्य विभागात स्टेशनरी साहित्याचा पुरवठयाचे बिल काढण्यासाठी बोगस हस्ताक्षर करण्यात आले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बोगस हस्ताक्षर केल्या. तसेच त्यांच्या संगणकांचा पासवर्डचा दुरुपयोग करून ६७ लाखांची बिले काढण्यात आल्याचे लक्षात येताच स्टेशनरी घोटाळा समोर आला. वित्त विभागाने बिलाला मंजुरी देताना कुठलीच शहानिशा न करता ६७ लाख रुपयाचे बिल मंजूर केले होते. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर महापालिकेतील वित्त व लेखा अधिकारी तसेच सामान्य प्रशासन विभागाचे सहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. यातील लिपिक व ऑडिटर सह पुरवठादार एजेन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती.कुठले साहित्य अव्वाच्या सव्वा दरात केले खरेदी -काँग्रेस नगरसेवक संदीप सहारे ( Congress corporator Sandeep Sahare )यांनी महापालिकेतील आणखी एक घोटाळा समोर आणला आहे. फक्त स्टेशनरी पुरता मर्यादित नसून कुलर आणि इतर साहित्याच्या खरेदीत ही गैरव्यवहार झाल्याचे माहितीच्या अधिकारात पुढे आणले. यात महानगरपालिकेकडून 40 लिटरचा कुलर 59 हजार रुपयात खरेदी करण्यात आला. 120 लिटरचा कुलर 79 हजार रुपयात खरेदी झाला. डॉट पेन हा 9.50 पैसे रुपये, प्लास्टिक कोटेड युपिन असलेली 198 रुपये, प्लास्टिक फोल्डर बॅग 187 रुपये, जेल पेन 34 रुपये, टेबल रायटिंग स्टॅन्ड 4450 रुपये, 150 मीलीची गोंद बॉटलही 125 रुपये, कॅल्क्युलेटरची किंमत 785 रुपये दाखवण्यात आलेली आहे. एकाच कुटुंबाकडे 40 वर्षांपासून कंत्राट -महापालिकेच्या कार्यालयांना मागील ४० वर्षांपासून स्टेशनरी व प्रिंटर साहित्याचा पुरवठा मनोहर साकोरे ॲण्ड कंपनी, स्वस्तिक ट्रेडिंग, गुरुकृपा स्टेशनरी, एस. के. एंटरप्रायजेस, सुदर्शन आदी कंपन्यांकडून केला जात आहे. पण या कंपन्या एकाच कुटुंबातील पण वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाने असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी सांगितले. त्यामुळे केवळ पाच वर्षांचीच नाहीतर गरज पडल्यास मागील 40 वर्षांपासून पुरवठ्याची चौकशी होण्याची गरज असल्याचे प्रकाश भोयर यांनी म्हटले.सर्वसाधारण सभेत काय होते याकडे लागले लक्ष -यासंदर्भात मनपाचे आयुक्त राधाकृष्ण बी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी दूरध्वनीवर प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची बाजू कळू शकली नाही. पण असे असले तरी 31 डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभा सुरेश भट सभागृहात होणार आहे. त्या सर्वसाधारण सभेतही चौकशी समितीचा मुद्दा येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सामोरा समोर येण्याची संभावना आहे.

Last Updated : Dec 31, 2021, 11:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.