ETV Bharat / city

Meteorological Center: आम्ही हवा खाऊन जगायचे का? कृषी हवामन केंद्रातील कर्मचाऱ्यांचा वर्षभरापासून पगार नाही - कृषी सल्ला देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार नाही

शेतकऱ्यांना पाऊसकाळ्यात पावासाचा दिलासा मिळतो तो हवामान विभागाच्या अंदाजावर. हवामान विभाग अंदाज देतो अन् शेतकरी त्यावर विश्वास ठेवत पेरणी, खूरपणी करत असतो. ( Meteorological Center ) मात्र, कृषी सल्ला देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हवा खाऊन जगण्याची वेळ आली आहे.

फोटो
फोटो
author img

By

Published : Jul 15, 2022, 4:58 PM IST

नागपुर - महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना हवामान आणि पावसाचा अंदाज घेऊन कृषी सल्ला देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हवा खाऊन जगण्याची वेळ आली आहे. वारंवार निवेदन देऊनही वर्षभरापासून फंडिंग एजन्सी असलेल्या हवामान विभागाला या जिल्हा स्तरावर कृषी विद्यापीठात कंत्राटी नेमलेले वेतानासाठी फंडच उपलब्ध झाला नाही. ( Agricultural Meteorological Center ) त्यामुळेच कृषी विषय शास्त्रज्ञ आणि कृषी हवामान निरीक्षक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती एका केंद्राची नसून महाराष्ट्रात 11 केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्याची अशीच अवस्था असून देशभरातील सुमारे 200 केंद्राव अशीच अवस्था वेतनाची असल्याचा आरोपही होत आहे.

हवामान विभागाकडून जिल्हा हवामान केंद्र चालवले जाते - देशभरात 27 राज्यातील 40 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना सल्ला देणाऱ्या डिस्ट्रिक्ट ऍग्रोमेट युनिटची स्थापना करण्यात आली आहे. यात (2017)मध्ये ग्रामीण कृषी मौसम विभागाच्या अखत्यारीत सुमारे 200 केंद्र सुरू करण्यात आले. ( Agricultural Meteorological Center In Pune ) या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना मोबाईलवर संदेश पाठवून कृषी सल्ला दिला जातो. यामुळे हा सल्ला शेतकऱ्यांना त्याचे पिकाचा नियोजनासह पीक काढणी, बाजारात विक्रीपर्यंत नेण्यासाठी महत्वाचा ठरतो. यामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यालयाच्या मदतीने हवामान विभागाकडून जिल्हा हवामान केंद्र चालवले जाते.

महाराष्ट्रात 11 केंद्र आहे कार्यान्वित - देशसभरात 500 पेक्षा अधिक केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. पण केवळ 200 केंद्र सुरू झाले. यात प्रत्येक केंद्रावर दोन कर्मचारी या पद्धतीने 400 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली. पण नियमित वर्षभर वेतन दिल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून म्हणजे एप्रिल 2021 पासून अद्याप 13 महिने लोटून वेतन दिले गेले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतून जात असताना आम्ही कृषी सल्ला द्यायचा कसा असा प्रश्न उपस्थित आहे.

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो कृषी सल्ला - शेतकऱ्यांना आठवड्यातून दोनवेळा म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी दोन दिवस बुलेटिन काढून पीक काढणी असो की खताचे, फवारणीचे नियोजन करण्यासाठी सल्ला दिला जातो. मागील पाच दिवसांचा अंदाज घेऊन पुढील काही दिवसांचा अंदाज तयार केला जातो. यात हा अहवाल तालुका स्तरावर असल्याने प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांचे शेतीचे नियोजन करण्यास उपयुक्त ठरते. यात सोशल मीडिया असो की एसएमएस, व्हॅटसअॅप ग्रुप यासारख्या विविध पर्यायाने शेतकरी वर्गापर्यंत माहिती पोहचून त्यांना मार्गदर्शन केले जाते. यात हवामानात होणाऱ्या बदलांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी सल्ला मोलाचा ठरतो.

कृषी मंत्र्यासह अनेकांना दिले निवेदन - यात महराष्ट्रात कार्यरत असलेल्या 11 केंद्रावरील कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचारी यांनी राज्याच्या तत्कालीन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनाही मेलद्वारे निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. यासह केंद्रातील संबंधित एजन्सीनासुद्धा निवेदन पाठवण्यात आलेली आहे. मागील वर्षभराचा काळ पाहता यात (20) पेक्षा जास्त निवेदन हे महाराष्ट्रातुन गेले असल्याचेही माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याचा अटीवर दिली आहे.

संतप्त प्रश्न आता कर्मचारी विचारू लागले आहेत - यामध्ये अजूनही कर्मचारी यांची कुठलीही संघटना नसल्याने कर्मचारी निवेदन देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. पण वर्ष लोटून मार्ग निघत नसल्याने करायचे तरी काय? खायचे काय? हवा खाऊन आम्ही कुटुंब जगवायचे का? असे संतप्त प्रश्न आता कर्मचारी विचारू लागले आहेत. यामध्ये तातडीने संबंधित एजन्सींनी लक्ष घालून वेतन देण्याची मागणी जोर धरत असून पुढे आंदोलनाचा पवित्र्यात आहे.

हेही वाचा - नांदगाव खंडेश्वर येथील छोरियानगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांवर दूषित व गढूळ पाणी पिण्याची वेळ!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.