ETV Bharat / city

राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भातला निर्णय दोन दिवसांत होईल

शाळा दिवाळीनंतर सुरू करायची की, आत्ता सुरू करायची यासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. त्यासाठी आरोग्य विभाग आणि टास्क फोर्ससोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू म्हणाले. ते नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Bachchu Kadu Nagpur Airport
शाळा सुरू माहिती बच्चू कडू
author img

By

Published : Sep 2, 2021, 3:50 PM IST

नागपूर - शाळा सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसांत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात शाळा दिवाळीनंतर सुरू करायची की आत्ता सुरू करायची यासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. त्यासाठी आरोग्य विभाग आणि टास्क फोर्ससोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू म्हणाले. ते नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

प्रतिक्रिया देताना मंत्री बच्चू कडू

हेही वाचा - नागपुरातून दुचाकी चोरून मध्यप्रदेशात ठेवायचा गहाण, 13 वाहनांसह चोरटा अटकेत

राज्यत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 17 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार होती, पण टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर शाळा सुरू करण्याला स्थगिती देण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या काही भागांत एकदम कमी आहे, पण अजूनही काही जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती पाहता धोका कमी झाला नाही. शाळा सुरू झाली पाहिजे, असे सर्वांना वाटत आहे. पण, केरळनंतर महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका आहे, यामुळे कुठलाही निर्णय घेताना सर्व बाबी लक्षात घ्यावा लागणार आहेत.

हेही वाचा - नागपुरात संघ परिवाराची दोन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.