नागपूर:- सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा नागपुरसह (Nagpur Weather Update) संपूर्ण विदर्भात तापमानात (Vidarbha Weather Update) घसरण झालेली आहे. संपूर्ण विदर्भात थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. मागील आठ दिवसांपासून तापमानात सहा अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे.
थंडीचा जोर वाढल्याने विदर्भातील सात जिल्ह्यांचे तापमान 10 डिग्री पेक्षाही खाली (Temprature Down in Maharashtra) आलेले आहे. आज सकाळी नागपुरचे तापमान 7.6 अंश सेल्सियस नोंदविण्यात आलेले आहे,तर सर्वात कमी तापमान गडचिरोली जिल्ह्याचे नोंदवण्यात आले आहे. आज गडचिरोलीचे (Gadchiroli Weather Update) तापमान 7.4 अंशावर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या २४ तासात गडचिरोलीच्या तापमानात 4.2 अंश सेल्सिअसची घसरण झाली आहे. उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे विदर्भात थंडीचा जोर वाढला आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखी थंडी वाढणार आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्याचे तापमान:-
शुक्रवारी उपराजधानी नागपूर मध्ये ०७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर चंद्रपूर मध्ये ०९.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. गोंदिया (Gondia Weather Update) येथे ०८.४ अंश सेल्सिअस, गडचिरोलीत ७.४ डिग्री तापमान, वर्धा ८.२ अंश सेल्सिअस (Wardha Weather Update), अमरावती ७.७ (Amaravati Weather Update), यवतमाळ:- १२.९ डिग्री (Yavatmal Weather Update), अकोला:- ११ (Akola Weather Update) अंश सेल्सिअस तर बुलढाणा:- ९ अंश सेल्सिअस तापमानात 8 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - Maharashtra Weather Updates : राज्य थंडीने गारठले; पाहा या शहरातील तापमान