ETV Bharat / city

Nitin Deshmukh Signature : शिवसेनेचे आमदार देशमुख म्हणतात, ती सही माझी नाही, व्हिडिओत मात्र सही करताना दिसले - एकनाथ शिंदेंची बंडखोरी

राज्यात राजकीय घडामोडीना वेग आला असताना एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी राज्यपाल यांना 35 आमदारांच्या सहीचे पत्र देत पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्या पत्रावर असलेली सही ही माझी नाही ( Nitin Deshmukh Signature Issue ), असे बाळापूरचे सेनेचे आमदार नितीन देशमुख ( MLA Nitin Deshmukh ) यांचे म्हणणे आहे. थोड्याच वेळात आपण अकोला येथे पत्रकार परिषद घेणार असून या संदर्भातही खुलासा करणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी दूरध्वनीवर बोलताना सांगितले.

nitin deshamukh
nitin deshamukh
author img

By

Published : Jun 22, 2022, 8:01 PM IST

नागपूर - राज्यात राजकीय घडामोडीना वेग आला असताना एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी राज्यपाल यांना 35 आमदारांच्या सहीचे पत्र देत पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्या पत्रावर असलेली सही ही माझी नाही ( Nitin Deshmukh Signature Issue ), असे बाळापूरचे सेनेचे आमदार नितीन देशमुख ( MLA Nitin Deshmukh ) यांचे म्हणणे आहे. थोड्याच वेळात आपण अकोला येथे पत्रकार परिषद घेणार असून या संदर्भातही खुलासा करणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी दूरध्वनीवर बोलताना सांगितले.

nitin deshamukh

चुकीचे घडत असल्याने परतलो - सेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी सेनेच्या गटनेते असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो होतो. मात्र तिथे काही तरी चुकीचे घडत असल्याने मी परत आलो असल्याचे नितीन देशमुख म्हणाले. मंत्र्यांसोबत गेलो होतो. माझी प्रकृती खराब नसताना जोर जबरदस्तीने मला दवाखान्यात दाखल केल्याचे त्यांनी याआधी सांगितले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या पाठिंब्याच्या सहीच्या दिलेल्या पत्रावरील सही माझी नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मग त्या पत्रावर देशमुखांची सही कोणी केली असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे देशमुख ती सही आपली नसल्याचे म्हणत असले तरी ते त्या पत्रावर सही करीत असल्याचे एका व्हिडिओ चित्रफितीत दिसत आहे. त्यामुळे त्यांचे ती सही माझी नाही हे म्हणणे खरे आहे की, सही करतानाचे चित्रीकरण खरे असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा - CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांचे बंडखोरांना भावनिक आवाहन; वाचा, संवादातील पाच महत्त्वाचे मुद्दे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.