ETV Bharat / city

'मॉब लिंचींग' आपली संस्कृती नाही; हा शब्द पाश्चिमात्यांच्या धर्म ग्रंथात - मोहन भागवत

author img

By

Published : Oct 8, 2019, 11:08 AM IST

Updated : Oct 8, 2019, 1:20 PM IST

'लिंचींग' हा शब्द आपल्याकडचा नसून, हा बाहेरून आणण्यात आला आहे. या मार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. तसेच सत्तेत असलेल्या स्वयंसेवकांची सुशासन ठेवण्याची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

लिंचिंग हा शब्द आपल्याकडचा  नसून, हा बाहेरून आणण्यात आल्याचे वक्तव्य सरसंघचालकांनी केले.

नागपूर - 'लिंचींग' हा शब्द आपल्याकडचा नसून हा पाश्चिमात्यांच्या धर्मग्रंथातून आला आहे. या मार्फत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नागपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालक बोलत होते.

'मॉब लिंचींग'बद्दल पुढे बोलताना, यामधील काही घटना बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकदा यामध्ये एकाच समाजाला लक्ष्य केले जात असल्याचे दिसते. परंतु, कित्येकदा हे उलटे घडते, असे ते म्हणाले. यामार्फत ठराविक समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. याप्रकारच्या घटना झाल्या की, ही सर्व समुदायामधील ठराविक लोकांची कृत्ये असल्याचे दाखवले जाते, मात्र समुदायातील काही लोकांची कृत्ये संपूर्ण समुदायावर थोपवली जात असल्याचा आरोप मोहन भागवत यांनी केला. अनेकदा यामध्ये संघाचे नाव घेतले जाते. परंतु, संघाचा कुठेच संबंध नसतो. हे संघासह हिंदुंचे नाव खराब करायचे षडयंत्र असल्याचे भागवत म्हणाले.

नागपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी, देशाच्या जनतेने पुन्हा भाजपवर विश्वास दाखवावा, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालकांनी आर्टिकल 370 हटवल्याबद्दल सरकारचे कौतुक करत पंतप्रधानांनी हा प्रश्न कुशलतेने हाताळल्याचे म्हटले. तसेच चांद्रयान मोहिमेवरून त्यांनी वैज्ञानिकांची प्रशंसा केली असून सध्या देशात उत्साह व आत्मविश्वासाचे वातावरण असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले.

हेही वाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा

सततच्या यशस्वी कारवायांमुळे लष्कराचे मनोबल वाढले आहे. तसेच देशाची समग्रता कायम ठेवण्यासाठी समुद्री भागात सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

देशातील विविधता म्हणजे देशाचे भूषण असून समाजातील काही शक्तींचा या विविधतेला भाषिक, प्रांतीय, जातीयवादी, भौगोलिक घटकांवर भेदभाव करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताची परंपरा उदारतावादाची असून, आपल्याकडे बुध्दाची शिकवण दिली जाते, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. देशाची प्रतिकार शक्ती समाजाच्या एकात्मतेत असून, देशाला आंबेडकरांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोकशाही फक्त पाश्चिमात्य देशांची मक्तेदारी नसून, ही आमची परंपरा आहे. सत्तेत असलेल्या स्वयंसेवकांची सुशासन ठेवण्याची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

सरसंघचालकांच्या भाषणातील मुद्दे

*लिंचींग हे आपल्यावर थोपवण्याचा व देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

*सध्या देशाचा जीडीपी 5% आहे; जेव्हा हे शून्यावर येते तेव्हा मंदी आल्याचे म्हटले जाते.

* मंदीवर मात करण्यासाठी सरकारसोबतच आपल्यालाही प्रयत्न करावे लागतील.

* देशात आर्थिक क्षेत्रातील व्यक्ती मजबूत असून, सरकारवर विश्वास ठेवायला हवा

* कृषी,लघु,मध्यम तसेच पर्यटन यांसारख्या उद्योगांना वाढवण्याची गरज आहे; जागतिक मंदीचा प्रभाव आपल्या देशावर पडत नाही

*संघाचे लोक स्वदेशी आहेत; आपल्या अटींवर व्यवहार करणे म्हणजे स्वदेशी ; स्वदेशी म्हणजे देशभक्तीचे रूप आहे.

* शिक्षण केवळ पोट भरण्यासाठी नाही; तर भाषा, संस्कृती, उत्कृष्ट पारंपरा उत्पन्न करणारी तसेच करुणा भरणारी शिक्षण व्यवस्था पाहिजे

*मातृशक्तीच्या उन्नतीसाठी प्रत्येकाला घरापासून सुरुवात करावी लागेल; संघ याबाबत विचार करत आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 8, 2019, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.