नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपूरच्या रवी भवन येथे कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू झाल्या (MNS meetings begin in presence of Raj Thackeray) आहेत. पुढील दोन दिवस बैठकांचे सत्र सुरू राहणार आहे. राज ठाकरे रवी भवन येथे दाखल होताच हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विदर्भ दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेकडून नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार (Raj Thackeray Nagpur tour) आहे. त्यानंतर उद्या जिल्ह्यातील सहा मतदारसंघाची राज ठाकरे परिस्थिती जाणून घेतील.
आज दिवसभर अश्याच प्रकारे बैठकांचे नियोजन करण्यात आले, असून उद्या देखील अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर शहरातील सहा आणि जिल्ह्यातील सहा अशा एकूण 12 विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर राज ठाकरे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. आढावा बैठकांच्या माध्यमातून राज ठाकरे महानगर पालिका निवडणुकीत पक्षाची ताकद कश्या प्रकारे वाढवता येईल, या संदर्भात देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार (MNS meetings begin in Nagpur) आहेत.
महानगरपालिकेच्या सर्व जागा लढवण्याचे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून नागपूर अमरावती आणि चंद्रपूर महानगरपालिकेतील सर्व जागा ताकतीनिशी लढवण्यात येतील, अश्या प्रकारचे संकेत देण्यात येत आहेत. ज्यांना मनसेसोबत निवडणुकीपूर्वी युती करायची असेल त्यांनी मुंबईत कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करावी, असे देखील वक्तव्य मनसे नेत्यांकडून केले जात (Raj Thackeray tour MNS meetings) आहेत. त्यामुळे येत्या काळात मनसे विदर्भात आपली ताकद वाढवण्याकरिता सक्रिय भूमिका पार पाडेल, अशीच शक्यता व्यक्त केली जाते आहे.