ETV Bharat / city

Prithviraj Chavan Nagpur : मुकुल वासनिकांना महाराष्ट्रातून उमेदवारी द्या; पृथ्वीराज चव्हाणांची हायकमांडकडे मागणी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Congress leader Prithviraj Chavan ) यांनी आपली वेगळी मागणी पुढे केली आहे. यात महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून उमेदवारी ( Congress leader Mukul Wasnik ) न देता महाराष्ट्रातून देण्यात यावं, अशी मागणी हायकमांडला केल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. ते नागपुरात बोलत होते.

Prithviraj Chavan Nagpur
Prithviraj Chavan Nagpur
author img

By

Published : May 30, 2022, 8:38 PM IST

Updated : May 30, 2022, 8:55 PM IST

नागपूर - महाराष्ट्रात काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी उत्तर प्रदेशाच्या इम्रान प्रतापगडीला दिल्याने अनेकजण नाराज असल्याचे बोलले जात आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Congress leader Prithviraj Chavan ) यांनी आपली वेगळी मागणी पुढे केली आहे. यात महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांना राजस्थानमधून उमेदवारी ( Congress leader Mukul Wasnik ) न देता महाराष्ट्रातून देण्यात यावं, अशी मागणी हायकमांडला केल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. ते नागपुरात बोलत होते.

प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण

'...तर महाराष्ट्राला झुकते माप मिळाले असते' : नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा ( मंगळवारी ) शेवटचा दिवस असल्याने हे शक्य आहे का असे विचारले असता त्यांनी सांगितले फार सोप नाही. परंतु जुना अर्ज काढून दुसरा अर्ज केल्यास मुकुल वासनिक हे महाराष्ट्रातील जागेवरून अर्ज दाखल करु शकतात, असेही ते म्हणालेत. पक्ष श्रेष्ठी मान्य करेल असे नाही. परंतु जर मुकुल वासनिक हे महाराष्ट्राचे नेते राहिल्याने त्यांना तिकीट दिले असतां महाराष्ट्राला झुकते माप मिळाले असते. शिवाय राज्यसभेचे उमेदवार म्हणून त्यांना मिळणारा निधीतून महाराष्ट्राला फायदा मिळाला असता, असेही चव्हाण म्हणाले.

'सगळ्यांचे समाधान करणे शक्य नाही' : काँग्रेसच्या वाट्याला 10 जागा आल्या आहेत. यात इच्छुक खूप असतात पण सगळ्यांचे समाधान करू शकत नाही. तिकीट देताना सभागृहात कोण काम करू शकते आणि दिल्लीतील एआयसीसीच्या काम कोण करू शकेल. या दोन प्रमुख गोष्टी असतात. यात मुकुक वासनिक यांना तिकीट महाराष्ट्रातून न देता बाहेर राज्यातील व्यक्तीला का दिले? असेही ते म्हणालेत. पक्ष श्रेष्ठींनी विनंती केली आहे. राजस्थान आणि छत्तीसगढ दोन्ही राज्यात बाहेरच्या लोकांना उमेदवारी दिले ही सुद्धा बाब मांडली आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

'हे तीन पक्षाचं सरकार' : राज्यातील आमदारांना होणाऱ्या निधी वाटपावरुनही पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात काँग्रेस आमदारांना निधी असमतोल पद्धतीने वाटप केला जातो, अशी खंत आहे. ज्या पद्धतीने निधी वाटप व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. ज्या विभागात निधीचे असमतोल वाटप झाले त्याठिकाणी काँग्रेसने आपले आग्रही मत मांडले आहे. एखाद्या काँग्रेस नेत्याकडून निधीत पक्षपात झाला असेल तर ते शोधले पाहिजे आणि सुधारणा केली पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले. हे तीन पक्षाचं सरकार आहे. ते चालवायचं असेल तर समानता असावी, अशी अपेक्षाही चव्हाण यांनी बोलून दाखवली आहे.

हेही वाचा - Piyush Goyal Filed Rajya Sabha Nomination : शिवसेनेने केलेला विश्वासघाताचा वचपा काढणार - पियूष गोयल

Last Updated : May 30, 2022, 8:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.