नागपूर - 16 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. विधिमंडळाचे सचिवालय सुरू झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहेत. यंदा हिवाळी अधिवेशनासाठी 5 दिवसांचा कार्यक्रम निर्धारित करण्यात आला असून, नवीन सरकारचे पहिलेच अधिवेशन असल्याने सर्वांचे लक्ष महाराष्ट्राकडे असणार आहे.
विधानसभेच्या बाजूला नव्याने तयार होत असलेल्या इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्याच्या निर्मितीपासूनच एक अधिवेशन उपराजधानी नागपूरमध्ये घेण्यात येते. विदर्भातील प्रश्नांना प्राधान्याने न्याय देण्याच्या हेतूने हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याची परंपरा आहे. मात्र, यावेळी केवळ 5 दिवसांचे अधिवेशन होणार असल्याने किती कामकाज होईल? याबद्दल अद्याप संदिग्धता आहे.